जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून २५ लाखांचा पुरस्कार पटकावला. गाव आदर्श करून एवढ्यावर न थांबता हगणदारीमुक्त करून भारत सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कार गावाने पटकावला आहे. तसेच गावाने जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करून महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा प्रथम पुरस्कार मिळविला आहे.आमच्या गावात आमचे सरकार, पंचायतराज पुरस्कार, जलस्वराज्य प्रकल्प राबवून गावाने आदर्श जपला आहे.आदर्श गावाचे प्रणेते केदा बापू काकुळते यांच्या मार्गदर्शनाने व पुढाकाराने गावात सामुदायिक मंगल कार्यालय व वृक्षलागवड करून पक्ष्यांचे गाव म्हणून व गार्डन गाव म्हणून ओळखले जात आहे.विभागातून नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांतून विभागून दोन ग्रामपंचायतींची तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून प्रत्येकी एका ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.लोकसहभागातून जलसंधारणाची कामेस्मार्ट व्हिलेजचे परीक्षण झाल्यानंतर जिल्ह्याच्या बक्षिसाला आपण १०० टक्के पात्र असू असा आशावाद असूनही एवढ्यावर न थांबता लोकवर्गणी व लोकसहभागातून अनेक नालाबांध करून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केलीत व ते नालाबांध पहिल्याच पावसात भरल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान आहे. जिल्ह्याच्या स्मार्ट व्हिलेजच्या मिळणाºया बक्षिसांची रक्कम गावाच्या विकासासाठी व गावाच्या सौंदर्यात भर कशी पडेल यासाठी सूत्रबद्ध नियोजन करून गाव अधिक स्मार्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
किकवारी खुर्दला २५ लाखांचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:27 IST
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून २५ लाखांचा पुरस्कार पटकावला.
किकवारी खुर्दला २५ लाखांचे बक्षीस
ठळक मुद्देग्रामस्वच्छता अभियान आदर्श गाव आता स्मार्ट व्हिलेज