इंदिरानगर : भारतनगरच्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पैशासाठी तिचा गुजरातमध्ये बळजबरीने विवाह लावल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत इंदिरानगर पोलिसांनी थेट अहमदाबाद येथून मुलीशी विवाह करणाऱ्या युवकासह दलालास अटक केली आहे. संशयितांना आज गुरुवारी (दि.१) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या शुक्रवारपर्यंत (दि.६) पोलीस कोठडी सुनावली आहे.भारतनगरमधील रहिवासी असलेल्या त्या चौदा वर्षीय मुलीची मैत्रीण संशयित आरोपी रिजवाना ऊर्फ राणू हमीद शेख यासह संशयित तौसिफ इमरान शहा याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या.
अपहरण प्रकरणी दलालासह दोघांना अटक
By admin | Updated: October 2, 2015 00:01 IST