येवला : दोन सुवर्ण, एक रौप्य, एक ब्रांझपदकयेवला : तालुक्यातील सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत वेगवेगळ्या गटातून दोन सुवर्णपदके व एक रौप्यपदक, तर एक ब्रांझपदक मिळवून येवला शहराच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे. या चारही विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.राहुरी विद्यापीठ येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत निकिता लोखंडे व सारिका बोंबले हिने वेगवेगळ्या गटात अंतिम फेरीत विजय प्राप्त करून सुवर्णपदकाची कमाई केली, जयश्री बोंबले हिने अंतिम फेरीत उपविजेतेपद पटकावून रौप्यपदक मिळवले, तर रूपाली गायकवाड हिने ब्रांझपदक मिळवले आहे. या चारही खेळाडूंची विशाखापट्टणम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, हे चारही खेळाडू महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहेत. या यशाबद्दल पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी हरिभाऊ जगताप, सचिन कळमकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
किक बॉक्सिंग स्पर्धेत यश
By admin | Updated: July 22, 2016 00:03 IST