बेलगाव कुऱ्हे : पूर्वभागातील राजकीयदृष्ट्या अग्रेसर असलेल्या घोटी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी बाळासाहेब खातळे यांची, तर उपसभापतिपदी पार्वताबाई रोंगटे यांची निवड झाली आहे.शुक्रवारी (दि. २८) सभापती -उपसभापतिपदासाठी इगतपुरी येथे झालेल्या बैठकीत नम्रता पॅनलचे बाळासाहेब खातळे व विष्णू गोडसे यांच्यात सरळ लढत होऊन खातळे यांना नऊ, तर गोडसे यांना अवघी चार मते मिळाल्याने बाळासाहेब खातळे यांची सभापतिपदी, तर उपसभापतिपदी पार्वताबाई किसन रोंगटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत बहुमत मिळूनही सभापतिपदासाठी एकाच पॅनलच्या उमेदवारात लढत झाली. यावेळी नामदेव रोंगटे, राजाराम कोकणे, लालू बिन्नोर, परशराम फोकणे, इंदूबाई फोकणे, सीताबाई कोकणे, उत्तम बोराडे, शिवाजी फोकणे, संतू फोकणे, बळीराम रोंगटे आदि संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय काकड यांनी काम पाहिले. (वार्ताहर)
सोसायटी सभापतिपदी खातळे
By admin | Updated: October 30, 2016 02:14 IST