लोहोणेर : जुलै महीना संपत आला आहे परंतु अद्यापही नाशिक जिल्ह्यातील विशेषत:, देवळा, कळवण, बागलाण, मालेगाव तालुक्यात पुरेशा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोंळबल्या असुन कळवण तालुक्यात तर अजिबात पाउस नसल्यामुळे पुनद, चणकापुर व बागलाण तालुक्यातील केळझर ही धरणे कोरडी ठाक आहेत. या गंभीर परिस्थितीची शासनाने वेळीच दखल घेण्याकरीता देवळा येथे तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांना निवेदन देण्यात आले.धरणातच पाणीसाठा नसल्यामुळे कसमादेतील शेतकऱ्यांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने वेळीच दखल घ्यावी व सक्तिची कर्ज वसुली तसेच विविध प्रकारच्या कर्जापोटी घेतलेल्या वसुलीसाठी होत असलेले जमीनीचे लीलाव थांबवावेत. जिल्हा बॅँकेसह इतर राष्ट्रीकृत बॅँकाकडुन त्वरित पीककर्ज उपलब्ध व्हावे. मागील वर्षी कांद्यासाठी घोषित केलेले कांदा अनुदानाचे पैसे त्वरित मिळावेत. केंद्र शासनाकडुन दिली जाणारी सहा हजारांची आर्थिक मदत कर्जखाती जमा न करता शेतकऱ्यांना रोख स्वरुपात मिळावी. ज्या शेतकºयांचे देवळा, उमराणे, सटाणा, मालेगाव बाजार समितीमधील व्यापाºयांनी कांद्याचे पैसे थकविले व दिलेले धनादेश वटत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी. पीक विम्याचे पैसे त्वरित मिळावेत संपुर्ण नाशिक जिल्ह्यात दुष्काळ मंडळे स्थापन झालेली असतांना सुद्धा सक्तीची कर्ज वसुली थांबलेली नाही. ती त्वरित थांबवावी. देवळा, कळवण, सटाणा, चांदवड, मालेगांव तालुके हे दुष्काळी तालुके घोषित करावेत इत्यादी मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटनाच्यावतीने देवळा तहसिलदार दत्रात्रेय शेजुळ यांना देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष कृष्णा जाधव, विनोद आहेर, कुबेर जाधव आदींनी तहसिलदारांची भेट घेतली.
पुरेशा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोंळबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 19:35 IST
लोहोणेर : जुलै महीना संपत आला आहे परंतु अद्यापही नाशिक जिल्ह्यातील विशेषत:, देवळा, कळवण, बागलाण, मालेगाव तालुक्यात पुरेशा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोंळबल्या असुन कळवण तालुक्यात तर अजिबात पाउस नसल्यामुळे पुनद, चणकापुर व बागलाण तालुक्यातील केळझर ही धरणे कोरडी ठाक आहेत. या गंभीर परिस्थितीची शासनाने वेळीच दखल घेण्याकरीता देवळा येथे तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांना निवेदन देण्यात आले.
पुरेशा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोंळबल्या
ठळक मुद्देनिवेदन : देवळा, कळवण, बागलाण, मालेगाव तालुक्यातील शेतकरी चिंतीत