शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामातील पिके सोंगणीस सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:36 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाची खरीप हंगामातील पिके सोंगणीची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी मजूर वर्ग उपलब्ध करण्यासाठी सध्या शेतकरी व्यस्त झाला आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने अपेक्षा भंग : मजूरटंचाईने शेतकरी त्रस्त

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाची खरीप हंगामातील पिके सोंगणीची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी मजूर वर्ग उपलब्ध करण्यासाठी सध्या शेतकरी व्यस्त झाला आहे.रब्बी हंगामात शेतकरी वर्गाला कुठल्याही शेती मालाला भाव भेटला नाही. भरपूर भांडवल खर्च करून ही उत्पन्नाची आवक पदरात काहीही न पडल्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. त्यात कोरोनाच्या साथीत द्राक्षबाग सापडल्याने चांगला द्राक्षमाल कवडीमोल भावाने विकावा लागला. या हंगामात बळीराजांचे पूर्ण कष्ट मातीमोल गेले. परंतु रब्बी हंगामात आलेला कटु अनुभव बाजुला सावरून बळीराजाने नव्या जोमाने खरीप हंगामासाठी जोरदार तयारी करून मका, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मुग, इ.पिकांना पसंती देत खरीप हंगामात दिंडोरी तालुक्यात 98 टक्के खरीप हंगामाचे उद्दिष्टे पूर्ण केले. अगोदर पाऊस चांगला झाल्याने खरीप हंगामातील पिके चांगल्या स्थितीत होते. परंतु पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गावर दुबार पेरणीचे संकट कोसळते की काय असा सवाल निर्माण झाला होता. परंतु परत पावसाने आपला लहरीपणा दाखवत दिंडोरी तालुक्यात जोरदार हजेरी लावली व दुबार पेरणीचे संकट टळले.सर्व पिके जोमात असताना परत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद, मुग व काही नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने जवळ जवळ सर्वच पिकांची वाट लागली. शेतकरी वर्गाला खरीप हंगाम चांगला जाईल व रब्बी हंगामातील नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा होती. परंतु परतीच्या पावसाने ही आशा फोल ठरविली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी