शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

पाच लाख शेतकऱ्यांना खरीप नुकसानीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:32 IST

नाशिक : अपुºया व कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके हातची गेलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांना शासनाने मदत करण्याचा निर्णय घेतल्याने त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना शासनाची आर्थिक मदत मिळणार असून, त्यासाठी मागणी केलेल्या सव्वाचारशे कोटी रुपयांपैकी शासनाने जेमतेम ८५ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात पाठविल्याने ते थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

ठळक मुद्देअद्यापही शासनाकडून साडेतीनशे कोटी रुपये येणे बाकी

नाशिक : अपुºया व कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके हातची गेलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांना शासनाने मदत करण्याचा निर्णय घेतल्याने त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना शासनाची आर्थिक मदत मिळणार असून, त्यासाठी मागणी केलेल्या सव्वाचारशे कोटी रुपयांपैकी शासनाने जेमतेम ८५ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात पाठविल्याने ते थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतकºयांच्या हातून पाण्याअभावी खरिपाची पिके गेली. काही गावांमध्ये पुरेशा पेरण्या होऊ शकल्या नाहीत, तर काही गावांना पावसाळ्यात टॅँकरने पाणी पुरवावे लागले. संपूर्ण पावसाळ्यात सरासरी ८२ टक्के पर्जन्यमान नोंदविले गेले तरी, त्यात बहुतांशी पाऊस पावसाचे माहेरघर येथेच पडला. त्यामुळे मालेगाव, नांदगाव, सिन्नर, चांदवड, देवळा, बागलाण, नाशिक, इगतपुरी या आठ तालुक्यांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्णासारखी परिस्थिती राज्यातही अनेक भागात निर्माण झाल्याने राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली. त्याचबरोबर केंद्र सरकारने राज्याला मदत करावी यासाठी अहवाल पाठविला. त्यानुसार केंद्रीय पथकाने नाशिक जिल्ह्णातील दुष्काळी गावांना भेट देऊन पाहणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यासाठी काही मदत जाहीर केली असली तरी, तत्पूर्वीच राज्य सरकारने खरिपात नुकसान झालेल्या शेतकºयांची माहिती गोळा करून त्याआधारे अंदाजित नुकसानीचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्णातील आठ तालुक्यांतील ५ लाख ४१ हजार २५७ शेतकºयांच्या चार लाख ८० हजार ६६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला सादर केला.शासनाने मे २०१३ मध्ये घेतलेल्या नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीच्या निर्णयाप्रमाणे कोरडवाहू शेतकºयाला प्रती हेक्टरी ६८०० याप्रमाणे दोन हेक्टरप्रमाणे तर बागाईती पिकासाठी १३,५०० रुपये हेक्टरी दोन हेक्टरपर्यंत व फळबागासाठी १८००० रुपये निश्चित केले आहेत. त्यानुसार जिल्ह्णातील शेतकºयांची संख्या लक्षात घेता, जिल्ह्णासाठी ४२६ कोटी ७८ लाख ५६ हजार १५१ रुपयांची मदतीची गरज असून, तसा प्रस्तावही शासनाकडे रवाना केला आहे. शासनाने गेल्या आठवड्यात ८५ कोटी २६ लाख ३३ हजार ६० रुपयांची मदत पाठविली असून, आठही तालुक्यांमध्ये समसमान पद्धतीने त्याचे वाटप सुरू झाले आहे. मात्र अद्यापही शासनाकडून साडेतीनशे कोटी रुपये येणे बाकी असून, शेतकºयांना त्याची प्रतीक्षा लागून आहे.