शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खमताणे-नवेगाव रस्ता बनला धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:34 IST

खमताणे : बागलाण परिसरात रस्त्याच्या दुरु स्तीची कामे वेगाने सुरू असली तरी खमताणे-नवेगाव रस्त्याची अवस्था दयनिय असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह खमताणे ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्दे बांधकाम विभागासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा

खमताणे : बागलाण परिसरात रस्त्याच्या दुरु स्तीची कामे वेगाने सुरू असली तरी खमताणे-नवेगाव रस्त्याची अवस्था दयनिय असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह खमताणे ग्रामस्थांनी केली आहे.खमताणे- नवेगाव ररस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील वाहतूकही मंदावली आहे. रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्याचे आजार उद्भले आहेत. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्ता खराब झाला आहे. प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे चालकांना समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होत आहे. खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना रोज शाळेत पोहोचायला उशीर होत आहे.शेतमाल वाहतुकीच्या गाड्यांचे पाटे तुटत आहे. सटाणा तालुक्याचे शहर असल्याने नवेगाव परिसरातील शेतकरी आपल्या शासकीय व खासगी कामकाजांसाठी याच मार्गाचा अवलंब करत असल्याने या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्डे ऐवढे मोठे आहे की त्यांनी रस्त्याचा अर्धा भाग व्यापला आहे. त्यामुळे हे खड्डे चुकविणे जिकिरीचे झाले आहे. बांधकाम विभाग वाट पाहात आहे का?बांधकाम विभागाकडून खमताणे-नवेगाव रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. लोकांच्या जिवाशी खेळण्यात येत असून, त्यात लोकांचा जीव जाण्याची वाट बांधकाम विभाग पाहात आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त केला नाही तर बांधकाम विभागासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खमताणे परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.