शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’चे कर्तव्य बजावले; मात्र लोकशाहीच्या अधिकारापासून पोलीस वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:27 IST

निवडणूक कोणतीही असो गल्लीची अथवा दिल्लीची. त्या सुरळीत पार पाडण्याची मुख्यत्वे जबाबदारी येऊन ठेपते ती ‘खाकी’वरच. सकाळी मतदान सुरू होण्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत ईव्हीएम यंत्रे सील करेपर्यंत पोलिसांना सक्तीने थांबावे लागले. घड्याळाचा काटा जसाजसा पुढे सरकत जातो, तसे त्यांच्याही मनात येते की आपणही मतदानाचा हक्क बजावावा; मात्र नाईलाजाने हक्कापासून वंचित रहावे लागते

ठळक मुद्देपोलीसदादाने खाकीचे  ‘कर्तव्य’ बजावलेटपालीची व्यवस्था अयशस्वीमतदानप्रक्रियेवर पाणी सोडावे लागले हे खरे

नाशिक : ‘वोट कर नाशिककर’ला नाशिकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाचा टक्का वाढविला; मात्र मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जावी, यासाठी डोळ्यांत तेल घालून बंदोबस्तावर असलेल्या ‘खाकी’च्या कर्मचाऱ्यांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही; मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘खाकी’चे कर्तव्य चोखपणे बजावले हे तितकेच खरे.पोलीस म्हटला की, बंदोबस्त आलाच. त्याला कुठलाही सण, उत्सव साजरा करता येत नाही व सण-उत्सव नागरिकांचे शांततेत साजरे व्हावे, यासाठी तो रस्त्यावर असतो. सोमवारी (दि.२९) लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा राष्टÑीय महोत्सव साजरा होत असतानाही नेमके हेच चित्र पहावयास मिळाले. पोलीस कर्मचारी वर्दी घालून रस्त्यावर उभा राहिला. मतदारांना लोकशाहीचा अधिकार निर्धास्त व सुरक्षितपणे बजावता यावा, यासाठी रणरणत्या उन्हात पोलीसदादाने खाकीचे  ‘कर्तव्य’ बजावले.निवडणूक कोणतीही असो गल्लीची अथवा दिल्लीची. त्या सुरळीत पार पाडण्याची मुख्यत्वे जबाबदारी येऊन ठेपते ती ‘खाकी’वरच. सकाळी मतदान सुरू होण्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत ईव्हीएम यंत्रे सील करेपर्यंत पोलिसांना सक्तीने थांबावे लागले. घड्याळाचा काटा जसाजसा पुढे सरकत जातो, तसे त्यांच्याही मनात येते की आपणही मतदानाचा हक्क बजावावा; मात्र नाईलाजाने हक्कापासून वंचित रहावे लागते; कारण ज्या केंद्राबाहेर ‘ड्युटी’ आहे, ते कें द्र सोडून ज्या केंद्रात नाव आले आहे, त्या केंद्रावर पोहचता येत नाही. त्यामुळे मतदानावर पाणी सोडावे लागते, असे काही पोलीस कर्मचा-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.मतदानासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले जवळपास दोन हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होते. वरिष्ठ अधिका-यांनी जरी मतदानाचा हक्क बजावला असला तरी पोलीस शिपाईपासून हवालदारपर्यंत सर्वांना मतदानापासून वंचित रहावे लागले ही वस्तूस्थिती. नाशिक पोलीस आयुक्तालयातील केवळ २० ते २५ टक्के कर्मचा-यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असला तरी निम्म्याहून अधिक कर्मचा-यांना मतदानप्रक्रियेवर पाणी सोडावे लागले हे खरे.टपालीची व्यवस्था अयशस्वीबंदोबस्तावरील अधिकारी-कर्मचा-यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था केली जाते. मतदानाच्या तीन दिवसांअगोदर टपाली मतदानासाठी कागदपत्रे द्यावी लागतात. मात्र निवडणूक मतदानापूर्वीच पोलिसांना बंदोबस्तावर हजर व्हावे लागत असल्याने त्यांना ते शक्य होत नाही. एकतर ग्राउंड बंदोबस्त नाहीतर बुथ बंदोबस्त असतो त्यामुळे आपली जागा सोडता येत नाही.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक