शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

काळोखात महिला साधकांच्या मदतीला धावली ‘खाकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:04 IST

आर्ट आॅफ लिव्हिंगचा मंगळवारी (दि.२९) भाऊबीज-दीपावली मीलन सत्संग सोहळा रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आटोपला अन् जमलेल्या शेकडो साधकांनी तपोभूमी सोडण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळेतच तपोभूमीत निरव शांतता अन् ‘साधुग्राम’भोवती किर्रर्र अंधार पसरला.

नाशिक : आर्ट आॅफ लिव्हिंगचा मंगळवारी (दि.२९) भाऊबीज-दीपावली मीलन सत्संग सोहळा रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आटोपला अन् जमलेल्या शेकडो साधकांनी तपोभूमी सोडण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळेतच तपोभूमीत निरव शांतता अन् ‘साधुग्राम’भोवती किर्रर्र अंधार पसरला. यावेळी परदेशस्थ दोन भारतीय महिला साधक त्यांची कार सुरू करण्यासाठी आटापिटा करतात, मात्र त्यांना यश येत नाही. वेळ वाढू लागते अन् त्यांच्याही पोटात भीतीचा गोळा उठतो. गस्तीवर असलेल्या दोघा पोलिसांची मदत महिला साधकांकडून मागितली जाते अन् ‘खाकी’ संकटसमयी धावून येते. सत्संग सोहळ्याला दोन महिला व त्यांच्यासोबत एक पुरुष असे तिघे साधक आपल्या लहान बाळासमवेत आले होते. सत्संग आटोपल्यानंतर हे तिघेही वाहनतळात उभ्या असलेल्या त्यांच्या कारजवळ गेले. महिला साधक पाठीमागे बसल्या आणि पुरुष साधकाने कार सुरू केली, मात्र कार सुरू झाली नाही. वृक्षराजींमध्ये असलेल्या वाहनतळात संपूर्ण अंधार आणि रातकिड्यांची किरकिर यामुळे महिला साधक काहीशा घाबरल्या होत्या. यावेळी एका महिलेने धाडस करत मुख्य रस्त्यापर्यंत येत पथदीपाच्या प्रकाशात उभे राहून रात्रीच्या पोलीस गस्तीच्या वाहनाला थांबण्याचा इशारा केला. आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस वाहन हवालदार मुनीर काझी, नाईक विनोद लखन यांनी तत्काळ थांबविले. महिलेने लखन यांना अडचण सांगितली व मदत मागितली. यावेळी त्यांच्या मदतीसाठी बिपीन शिंगाडा आणि त्यांचे मित्र सुरेश भावसार आले. चौघांनी मिळून पुन्हा कारला धक्का देत सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र कार काही सुरू होत नव्हती. पाउण तासानंतर काझी यांच्या ‘मॅकेनिझम’ला यश आले.बॅटरीच्या वायरींना आलेल्या कार्बनमुळे विद्युत पुरवठा इंजिनपर्यंत होत नव्हता. परिणामी कारचे इंजिन स्टार्ट होत नसल्याची बाब मुनीर काझी व लखन यांच्या लक्षात आली. या दोघांनी बॅटरीच्या दोन्ही वायरी काढून लहानशा दगडावर घासत पुन्हा धन-ऋण आपल्या कौशल्याने तपासून बसविल्या आणि महिला चालकाला मोटार सुरू करण्यास सांगितले आणि त्यांचा प्रयोग यशस्वी झाला.

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिला