शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खाकीचा गहिवर!

By किरण अग्रवाल | Updated: November 4, 2018 00:33 IST

खाकीच्या धाकाची, अथवा तो ओसरल्याची बाब नेहमीच चर्चेत येते किंवा टीका-टिप्पणीची ठरते; परंतु या ‘खाकी’तही असलेल्या माणुसकीचा गहिवर जेव्हा प्रत्ययास येतो तेव्हा त्यास सलाम केल्याखेरीज राहता येत नाही. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म व संवेदनशीलतेचा परिचय घडविणाऱ्या अशा घटना अपवादात्मक असतात; परंतु त्या इतरांसमोर आदर्श घालून देणाºया ठरतात. रस्त्यावर टाकून दिलेल्या बेवारस अर्भकाला मायेची ऊब देणाºया पोलीस दलातील भगिनींचे कार्य असेच दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुहृदयतेचा उजेड पेरणारेच ठरले आहे.

ठळक मुद्देबेवारस अर्भकाला मायेची ऊबचांगुलपणाचीच पूजा सारे मिळून बांधूया...

खाकीच्या धाकाची, अथवा तो ओसरल्याची बाब नेहमीच चर्चेत येते किंवा टीका-टिप्पणीची ठरते; परंतु या ‘खाकी’तही असलेल्या माणुसकीचा गहिवर जेव्हा प्रत्ययास येतो तेव्हा त्यास सलाम केल्याखेरीज राहता येत नाही. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म व संवेदनशीलतेचा परिचय घडविणाऱ्या अशा घटना अपवादात्मक असतात; परंतु त्या इतरांसमोर आदर्श घालून देणाºया ठरतात. रस्त्यावर टाकून दिलेल्या बेवारस अर्भकाला मायेची ऊब देणाºया पोलीस दलातील भगिनींचे कार्य असेच दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुहृदयतेचा उजेड पेरणारेच ठरले आहे.पोलीस दलाशी संबंधित वार्ता या अधिकतर अप्रियतेत मोडणाºयाच असतात; परंतु अशाही स्थितीत सारेच काही अंधकारलेले नाही या आशावादाला ज्यामुळे बळकटी प्राप्त होऊन जाते, तशात मोडणारी एक घटना अलीकडेच नाशिक जिल्ह्यात अनुभवयास आली आहे. साधारणत: तिनेक आठवड्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील खंबाळेनजीक एका मंदिराजवळ एक नवजात बालक आढळून आले होते. अनाथाश्रमाकडे जाणारा हा मार्ग असल्याने कुणीतरी या बालकाला अनाथपणे तेथे टाकून दिले असावे; पण याबाबतची माहिती मिळताच त्र्यंबक पोलिसांनी तात्काळ तेथे पोहोचून बालकाला ताब्यात घेतले व रुग्णालयात दाखल केले. हे अर्भक सात महिन्यातच (प्रिमॅच्युअर) जन्मलेले असल्याने त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवणे गरजेचे होते. त्र्यंबकच्या पोलीस कॉन्स्टेबल ऋतुजा कुमावत, पद्मा चव्हाण, योगीता पुंड, माया गाडे व निता पटेकर या पाची जणींनी तब्बल २१ दिवस या बाळाची काळजी घेतली. विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या पत्नी रोहिणी दराडे यांनीही यात लक्ष पुरविले व मायेच्या ममतेचा परिचय देत या बाळाचे गार्गी असे नामकरणही केले. शेवटी मातेचे हृदय काय असते व कोणत्याही पाल्यासाठी ते कसे धडधडते हेच यातून बघावयास मिळाले. हाती पडले तेव्हा अवघे ७०० ग्रॅम वजन असलेले हे बालक रुग्णालयात राहून १५०० ग्रॅमचे झाल्याने अखेर त्यास आधाराश्रमात दाखल करण्यात आले. अर्थात, आधाराश्रमात गेले असले तरी ते आता निराधार नक्कीच राहिलेले नाही. परिस्थितीने ते अनाथ ठरले, मात्र ‘खाकी’तील मातृत्वाचा गहिवर या बालकाला नवे जीवन देऊन गेला आहे. दीपावलीनिमित्त दिव्यांनी व आकाशकंदिलांनी चहूदिशा उजळून निघत असताना एका अनाथाच्या आयुष्यात नवा उजेड प्रकाशला आहे. या चांगुलपणाचीच पूजा सारे मिळून बांधूया...

 

टॅग्स :Policeपोलिस