जळगाव नेऊर : खैरगव्हाण येथील कुलदैवत खंडेराव महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्त भव्य काठी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.या मिरवणुकीत येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत महिला पुरु ष भंडाऱ्यात न्हावून निघाले होते. तसेच मल्हार गीतांवर वाद्याच्या तालावर ठेका धरत महिला पुरु ष खंडेरायाच्या भक्तीत दंग झाले होते. सायंकाळी सहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री पूजा विधी करून सुप्रसिद्ध मिराताई कावळे औरंगाबादकर यांचा जागरण गोंधळाच्या कार्यक्र माने सांगता झाली.कार्यक्र म यशस्वीतेसाठी समाधान सावंत, भिमाजी सावंत, शिवाजी सैद, विजय सैद, अनिल सैद, उमाकांत सावंत, तानाजी सावंत, ज्ञानदेव शिंदे, ज्ञानदेव सैद, सुनील सैद, अमोल सालमुठे, ज्ञानेश्वर सावंत, नवनाथ सावंत, अर्जुन सैद, नवनाथ सैद, दिगंबर सैद, विश्वंभर सैद, संतोष घुले, संजय सालमुठे, श्रावण सालमुठे यांनी परिश्रम घेतले.
खैरगव्हाणला खंडेराव महाराज यात्रा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 19:47 IST
जळगाव नेऊर : खैरगव्हाण येथील कुलदैवत खंडेराव महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्त भव्य काठी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. या ...
खैरगव्हाणला खंडेराव महाराज यात्रा उत्सव
ठळक मुद्देसुप्रसिद्ध मिराताई कावळे औरंगाबादकर यांचा जागरण गोंधळाच्या कार्यक्र माने सांगता