शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा-गोपालवाडी रस्त्यावर खड्डेच-खड्डे; मनपाचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 17:03 IST

नाशिक : वडाळागावातील सिध्द हनुमान मंदिरापासून गोपालवाडीमार्गे श्री.श्री.रविशंकर दिव्य या १००फूटी रस्त्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असलेला गोपालवाडी रस्त्याची प्रचंड ...

ठळक मुद्देमुख्य रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेवडाळागावाचा मुख्य रहदारीच्या रस्त्याचे तीनतेरा झाले भूयारी गटारीच्या कामांमुळे रस्त्यांची प्रचंड दुर्दशा

नाशिक : वडाळागावातील सिध्द हनुमान मंदिरापासून गोपालवाडीमार्गे श्री.श्री.रविशंकर दिव्य या १००फूटी रस्त्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असलेला गोपालवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या भागात गटारीचे काम करण्यात आले. त्यानंतर थातुरमातुर पध्दतीने मुरूम टाकण्यात येऊन रस्ता दुरूस्ती के ली गेली; मात्र पावसाळ्यात खडीकरण वाहून गेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.भूमिगत गटारीच्या कामासाठी हा रस्ता तीन महिन्यांपुर्वी मनपाच्या भूयारी गटार विभागाकडून खोदला गेला. त्यानंतर गटारीचे काम आटोपल्यानंतर उखडलेल्या रस्त्याचे खडीकरण कसे तरी संबंधित विभागाकडून केले गेले; मात्र मागील पंधरवड्यापुर्वी झालेल्या जोरदार संततधारेत खडीकरण वाहून गेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच सर्वत्र गाळ साचला आहे. यामुळे रस्त्यावरून पायी जाणेदेखील शक्य होत नसल्याने या भागातील नागरिकांना रस्ता बदलावा लागत आहे. वाहने येथून मार्गस्थ होताच नादुरूस्त होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मनपा प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरूस्तीकडे कानाडोळा केला जात आहे. पावसाने उघडीप देऊनदेखील अद्याप वडाळागावातील रस्त्यांची दुरूस्तीकडे लक्ष पुरविले जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.वडाळागावात पावसाळापुर्व भूयारी गटारीच्या कामांमुळे रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. तसेच रस्ता एका बाजूने पुर्णपणे उखडला आहे. त्यामुळे त्याचा वापर नागरिकांना करता येणे अशक्य होत आहे. वडाळा चौफूलीपासून थेट पांढरी आई देवी मंदिरापर्यंत वडाळागावाचा मुख्य रहदारीच्या रस्त्याचे तीनतेरा झाले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांचीही दुरूस्ती करणे गरजेचे आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे मनपा प्रशासनाने माती-मुरूम टाकून खड्डे बुजविण्यापेक्षा थेट डांबरीकरण करण्यावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे. कारण श्रावणसरींचा वर्षाव अद्यापही सुरू असून पावसाने माती, मुरूम वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरण्यास मदत होईल, असे नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad transportरस्ते वाहतूक