शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कायाकल्प’ योजनेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या  जिल्हा रुग्णालयात खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 01:06 IST

केंद्र सरकारच्या ‘कायाकल्प’ योजनेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मात्र संततधारेने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचे डबके साचत असून रुग्णांसह नातेवाइकांचेही हाल होत आहेत.

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘कायाकल्प’ योजनेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मात्र संततधारेने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचे डबके साचत असून रुग्णांसह नातेवाइकांचेही हाल होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण परिसरातील खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.जिल्हा सरकारी रु ग्णालयाच्या प्रवेशद्वारालगतच पोलीस चौकी असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने चौकीभोवती पाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाइकांना चिखल तुडवत पोलीस चौकीची पायरी चढावी लागत असल्याचे चित्र आहे. याबाबत जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्र ार करत परिसरातील आवारात डांबरीकरण करण्याची मागणी केली होती, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.शहरात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. रविवारी जोरदार पाऊस झाल्याने रुग्णालयाच्या आवाराची दुरवस्था झाली. पोलीस चौकीची पहिली पायरी पाण्याखाली बुडाल्याचे चित्र होते. तसेच रुग्णालयाच्या परिसरात मुख्य प्रवेशद्वारापासून सगळीकडे पसरलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने डबके साचले होते. पोलीस चौकीसमोर मात्र सखल भाग असल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा रुग्णालय असल्यामुळे मोठ्या संख्येने रुग्णवाहिका, पोलीस वाहने, नागरिकांच्या वाहनांनी ये-जा सुरू असते. त्यामुळे या भागात चांगल्या दर्जाचे डांबरीकरण करण्याची गरज आहे. थातूरमातूर पद्धतीने मुरूम टाकून प्रश्न मार्गी लागणार नाही़रुग्णांना बसतोय ‘दणका’४शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून खड्डे पडले असल्यामुळे स्ट्रेचरपर्यंत रुग्णवाहिका येईपर्यंत रुग्णवाहिकेत असलेल्या रुग्णांना चांगलेच दणके सहन करावे लागतात. अत्यवस्थ गंभीर परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात पोहचविण्याचे आव्हान रुग्णवाहिका चालकांपुढे असते त्यामुळे रुग्णवाहिकांचा वेग साहजिकच अधिक असतो; मात्र रुग्णालयात प्रवेश करताना सर्वच रुग्णवाहिकांचा वेग कमी होतो कारण मुख्य रस्त्यावरून वळण घेत आतमध्ये यावे लागते. मात्र तरीदेखील थोड्या अधिक प्रमाणात वेगाने रुग्णवाहिका दाखल होतात. यावेळी परिसरात असलेल्या खड्ड्यांमुळे रुग्णवाहिका आदळत इमारतीच्या पोर्चपर्यंत पोहचते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलroad safetyरस्ते सुरक्षा