नाशिक : खेरवाडी येथे शेतामध्ये काम करीत असताना सर्पदंश झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला़ याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील सुशाबाई दत्तू आवारे ही महिला दुपारी शेतात काम करीत होती़ दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या हाताला सर्पदंश झाला़ त्यांना मुलगा योगेश याने तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले़ यावेळी उपचार सुरू असताना साडेचार वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ खेरकर यांनी घोषित केले़ या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
सर्पदंशाने खेरवाडीतील महिलेचा मृत्यू
By admin | Updated: November 10, 2014 00:15 IST