शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील केरळी, मुस्लीम बांधवांतर्फे पूरग्रस्तांना भरघोस मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:48 IST

केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या केरळमध्ये सर्वस्तरातून विविध स्वरूपात मदतीचा ओघ सुरू असताना सिडकोतून मोठ्या प्रमाणात केरळी बांधवांनी आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

सिडको : केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या केरळमध्ये सर्वस्तरातून विविध स्वरूपात मदतीचा ओघ सुरू असताना सिडकोतून मोठ्या प्रमाणात केरळी बांधवांनी आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.  सिडकोतील मुस्लीम बांधवांनी फिरदोस मशीदमधील शुक्र वारच्या नमाज पठनानंतर खतीब ए शहर हाफीज हिसोमोद्दीन खतीब यांनी केलेल्या आवाहनानंतर अवघ्या एका तासात बावीस हजार रु पयांचा निधी संकलित करण्यात आला, तर नमाज पठणात केरळमधील नागरिकांसाठी विशेष दुवा यावेळी करण्यात आली. सदर निधी संकलनांसाठी मोईन शेख, साजिद पटेल, नवीद जहांगिरदार, जावेद शेख, मोहम्मद शेख आदी मुस्लीम बांधवांनी सहकार्य केले.  दुसरीकडे नाशिक मल्याळी कल्चरल असोसिएशनतर्फे सुमारे दोन ट्रक साहित्य संकलित करण्यात आले. यामध्ये किराणा माल, कपडे, औषधी, पिण्याचे पाणी आदी वस्तूंचा समावेश आहे. तर रोख स्वरूपात जमा झालेली एक लाख रु पयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे. यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष गोगुलम पिल्ले, अनुव पुष्पानं, सोनू जॉर्ज, गिरीश नायर, विन्न्न पिल्ले, राधाकृष्ण पिल्ले, नीतू मनोज, विपीन भास्कर आदींसह मायको, बॉश, संदीप फाउंडेशन, एच.ए.एल. शिवसरस्वती आदींचे सहकार्य मिळाले आहे.देवळाली कॅम्प येथून केरळला मदत रवानादेवळाली कॅम्प येथे केरळ पूरग्रस्तांसाठी गुरू सोशल फाउंडेशन, इनरव्हील क्लब, सावन कृपाल रूहानी मिशन व मल्याळी असोसिएशनच्या वतीने जमा झालेले साहित्य केरळला रवाना करण्यात आले. जमा झालेले अन्नधान्य, कपडे, औषधे व जीवनावश्यक वस्तू आदी साहित्य केरळला पाठविण्यात आले. यावेळी प्रशांत कापसे, शिनू जोस, जिशान खान, शिबू जोस, वाजिद सय्यद, नितीन गायकवाड, दत्ता सुजगुरे, जुबीन शहा, संजय गोडसे, राजेंद्र सोनवणे, मनीष चावला, अनिश साळुंके, आरिफ शेख, जहिर सय्यद, संजय गायकवाड, मनोज गायकवाड, विनोद सारस आदी उपस्थित होते.

टॅग्स :floodपूरKerala Floodsकेरळ पूर