शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला मिळणार केंद्रीय विद्यालय; शुभवर्तमान : केंद्राच्या पथकाकडून तीन शाळांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:24 IST

नाशिक : शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त करून देतानाच सुविधांचा लाभ पुरविणारे केंद्रीय विद्यालय महापालिकेला मिळणार असून, केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास संसाधन मंत्रालयाच्या पथकाने त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तीन शाळांची नुकतीच पाहणी केली आहे. या निवासी केंद्रीय विद्यालयामुळे महापालिका शाळांमधील स्कॉलर विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देमहापालिकेला मिळणार केंद्रीय विद्यालयशुभवर्तमान : केंद्राच्या पथकाकडून तीन शाळांची पाहणी

नाशिक : शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी प्राप्त करून देतानाच सुविधांचा लाभ पुरविणारे केंद्रीय विद्यालय महापालिकेला मिळणार असून, केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास संसाधन मंत्रालयाच्या पथकाने त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तीन शाळांची नुकतीच पाहणी केली आहे. या निवासी केंद्रीय विद्यालयामुळे महापालिका शाळांमधील स्कॉलर विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त होण्यास मदत होणार आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर नाशिक दौºयावर आले असता, त्यांच्यापुढे बंद पडत चाललेल्या महापालिका शाळांबाबत गांभीर्याने चर्चा झाली होती. यावेळी महापालिकेला केंद्रीय विद्यालय देता येईल काय, याची चाचपणी जावडेकर यांनी केली होती. त्यानुसार, चार जणांचे पथक सुरुवातीला नाशिक दौºयावर आले होते तर गेल्या शनिवारी (दि.९) उपसंचालकांसह आणखी चौघांचे पथक नाशिकला येऊन गेले.सदर पथकाने महापालिकेच्या बी. डी. भालेकर हायस्कूल, मोटकरवाडी येथील शाळा क्रमांक ६६ आणि जेतवननगर येथील शाळा क्रमांक ११० या शाळांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान, पथकाने शाळांची इमारत, तेथील वर्गखोल्या, त्यांची लांबी-रुंदी, शाळांचे प्रांगण, मुला-मुलींसाठी असलेले स्वच्छतागृह, शाळांमध्ये देण्यात आलेल्या सोयीसुविधा यांची बारकाईने तपासणी केली. सदर शाळांच्या मुख्याध्यापकांकडून त्यासंबंधीचा छायाचित्रांसह अहवालही मागविण्यात आला. त्यानुसार, वडनेर दुमाला येथील केंद्रीय विद्यालयात महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी केंद्रीय पथकासमोर अहवालाचे सादरीकरण केले. कसे असेल केंद्रीय विद्यालयकेंद्रीय विद्यालय हे पूर्णपणे निवासी असणार आहे. या विद्यालयात अत्याधुनिक सर्व सोयीसुविधा असतील. सदर विद्यालयासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊ शकेल शिवाय, प्रशिक्षित शिक्षकवर्गही उपलब्ध होईल. मनपा शाळांमध्ये जे विद्यार्थी स्कॉलर असतील, शिष्यवृत्तीधारक असतील अशा मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या या विद्यालयातून मुलांची स्पर्धा परीक्षांविषयकही तयारी करून घेतली जाणार आहे.