शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

केळकर यांचे शास्त्रीय गायन रंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:28 IST

पंडित शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे कोठारी कन्या शाळेत आयोजित कार्यक्रमात मुंबईचे युवा गायक केदार केळकर यांचे शास्त्रीय गायन सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

ठळक मुद्देस्वरसाधना : वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम

नाशिकरोड : पंडित शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे कोठारी कन्या शाळेत आयोजित कार्यक्रमात मुंबईचे युवा गायक केदार केळकर यांचे शास्त्रीय गायन सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.जेलरोडच्या कन्या कोठारी शाळेत झालेल्या दरमहा संगीत मैफलीत गायक केदार केळकर यांनी शुद्ध कल्याण रागात विलंबित ख्यालात एक तालात त्यांनी साधे सूर साधे रिझावे ही बंदिश सादर करत आलापांचे आविष्कार दाखविले. मध्य लयीत राग बिहागमध्ये त्यांनी पंडित सी. आर. व्यासांची ले जा रे पथिक वा ही बंदिश सादर केली. मध्य एक तालात सुरतीया यू देखी अशी अप्रतिम बंदिश सादर केली. बागेश्री रागात संगीत सौभद्र नाटकातील बहुत दिन नच भेटलो सुंदरीला हे नाट्यपद समर्थपणे सादर केल्याने कुमार गंधर्वांच्या गायकीची अनुभूती आली. संवादिनीवर सागर कुलकर्णी व तबल्यावर संगीत कुलकर्णी यांनी साथ दिली.यावेळी पंडित शंकर वैरागकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत एकून नियमित रियाज केला पाहिजे. आदत, जिगर और हिसाब असेल तर गायन वेगळ्या उंचीवर जाते. कष्ट केले तर फळ हे निश्चित मिळते असे पंडित शंकर वैरागकर यांनी सांगितले.गायक व पाहुण्यांचा परिचय शुभांगी देवधर यांनी करून दिला. आभार प्रफुल्ल कुलकर्णी यांनी मानले. गोपाळ सौंदाने आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. सुनील देवधर, आत्माराम हगवणे, उध्दव हांडोरे, शरद शिंदे, चंद्रकांत लोंढे, शिवाजी पैठणकर, किशोर चव्हाण, ओंकार वैरागकर, सरिता वैरागकर, पी. व्ही. जोशी, श्रीकांत कुलकर्णी, ओम ढेमसे, एच. बी. कुंटे, एस. पी. ठाकूर, श्रुती बोरसे, समृद्धी गांगुर्डे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक