शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वारी हा आध्यात्मिक धार्मिक ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:17 IST

पंढरीची वारी ही एक निरंतर आणि अखंड अशी सांप्रदायिक परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचा तो मोलाचा आध्यामिक आणि धार्मिक ठेवा आहे. वारीत कोणत्याही प्रकारच्या जातीभेदाला थारा नसतो. एकप्रकारे सर्वधर्मसमभाव येथे जपला जातो. संत श्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थानचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना वारीतील वारकऱ्यांची आणि पर्यायाने साधू-संतांची तद्वतच पांडूरंगाची सेवा करण्याचे कार्य ...

पंढरीची वारी ही एक निरंतर आणि अखंड अशी सांप्रदायिक परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचा तो मोलाचा आध्यामिक आणि धार्मिक ठेवा आहे. वारीत कोणत्याही प्रकारच्या जातीभेदाला थारा नसतो. एकप्रकारे सर्वधर्मसमभाव येथे जपला जातो. संत श्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थानचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना वारीतील वारकऱ्यांची आणि पर्यायाने साधू-संतांची तद्वतच पांडूरंगाची सेवा करण्याचे कार्य माझ्या हातून घडले याचे आत्मिक समाधान वाटते. दोन तपांपेक्षा जास्त काळ वारी करण्याचा अनुभव आला. तेव्हा वारकºयांच्या सुख-दु:खात सहभागी होता आले. आर्थिक परिस्थिती योग्य नसताना खेड्यापाड्यातील गोरगरीब लोक पंढरीच्या वारीत सहभागी होतात. एकप्रकारे विलक्षण असा सोहळा असतो. त्यांच्या जिवाला एकच ध्यास लागलेला असतो तो म्हणजे पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन घेण्याचा होय. वारीमध्ये कुठल्याही अन्य विषयांवर चर्चा होत नसते, चर्चा होते फक्त परमार्थाची. त्याचप्रमाणे वारीमध्ये मनुष्याच्या अंगी स्वंयपूर्णत: येते. प्रत्येकजन हा स्वत:चे काम स्वत:च करीत असतो. दुसºयावर अवलंबून नसतो. समजा घरी स्वत:च्या हातानेही प्यायला पाणी न घेणारा मनुष्य येथे काही वेळा स्वत: विहिरीतून पाणी काढून दुसºयांना पाणी वाटतांना दिसतो. त्र्यंबकेश्वरपासून ते पंढरपूरपर्यंत लांबचा पल्ला असल्याने साधारणत: २७ दिवस लागतात. यावेळी मनुष्याचे स्वभाव एकमेकांना कळतात. स्वत:मधील गुणदोषाचा मनुष्य विचार करू लागतो. भजनं गात सतत चालत राहिल्याने आत्मिक व आध्यात्मिक सुख तर लाभतेच, परंतु चालल्यामुळे शरीरातील व्याधीही नष्ट होतात. विशेष म्हणजे भारतात कोणत्याही तीर्थक्षेत्री जाताना भाविक हे शक्यतो वाहनाने जातात. परंतु पंढरीला मात्र पायीच जाण्याची प्रथा आहे. काही लोक वाहनाने जातात परंतु या ठिकाणी लांबच लांब दर्शन रांगेत उभे राहूनदेखील खूप चालणे होते. त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर पांडूरंगाचे दर्शन झाल्याचा एक वेगळाच आनंद भाविकांच्या आणि वारकºयांच्या चेहºयावर दिसून येतो.संत निवृत्तिनाथ वारीत त्र्यंबकेश्वरहून सुमारे ३० वर्षांपूर्वी साधारणत: ३०० वारकरी सहभागी होत पुढे ही संख्या पंढरपुराला जाईपर्यंत दोन ते तीन हजारपर्यंत होत असे. आता मात्र वारीच्या प्रारंभीच त्र्यंबकेश्वर येथून सुमारे १५ हजार वारकरी निघतात आणि वाटेत अन्य ठिकाणी वारकरी सहभागी होत होत ही संख्या ४० हजारांपेक्षा जास्त होते.- मुरलीधर पाटील(लेखक संत निवृत्तिनाथ संस्थानाचे  माजी अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी