शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कलेच्या संवर्धनासाठी कार्यरत ठेवा संस्कृतीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:15 IST

शाळेच्या २२ वर्षांनंतर भेटलेल्या मैत्रिणी, त्यांनी स्थापन केलेला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, त्यातून काहीतरी वेगळे करावे या विचारातून सुरू झालेले छोटेछोटे उपक्रम व त्यातून आकाराला आलेली ‘ठेवा संस्कृतीचा’ संस्था. आॅगस्ट २०१६ पासून या ग्रुपतर्फे विविध उपक्रमास प्रारंभ झाला.

परिचय महिला संस्थांचाशाळेच्या २२ वर्षांनंतर भेटलेल्या मैत्रिणी, त्यांनी स्थापन केलेला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, त्यातून काहीतरी वेगळे करावे या विचारातून सुरू झालेले छोटेछोटे उपक्रम व त्यातून आकाराला आलेली ‘ठेवा संस्कृतीचा’ संस्था. आॅगस्ट २०१६ पासून या ग्रुपतर्फे विविध उपक्रमास प्रारंभ झाला. या ग्रुपच्या माध्यमातून प्रारंभी सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम करण्याची कल्पना पुढे आली. अभिनेत्री पल्लवी पटवर्धन, गायत्री बेळगे, वैशाली साठे, सोहा लाळे या मैत्रिणींना हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यानंतर समाजातील विविध स्तरातील महिलांना त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडी उसंत मिळावी व आपली संस्कृती, परंपरा, सण व व्रतवैकल्य यांची जपणूक करता यावी, या उद्देशाने ‘ठेवा संस्कृतीचा’ विविध उपक्रम राबवू लागले. संस्थेने आजवर भोंडला, श्रीसुक्त पठण, गरबा-दांडिया, दीपोत्सव, संक्रांतीचे हळदी-कुंकू, उखाणे, पाककला, फुलांची रांगोळी अशा स्पर्धा, कार्यक्रम राबविले. महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. यात ग्रुपच्या प्रत्येकीने तिच्या भागातील कष्टकरी स्त्रियांचा सन्मान केला.‘गहिरीसम्भवा- एका स्त्रीचा प्रवास’ या काव्यसंग्रहातील व कवी किशोर पाठक यांच्या काव्यसंग्रहातील निवडक कवितांचा अभिवाचनपर काव्यवाचन हा प्रयोग ग्रुपमधील मैत्रिणींना घेऊन केला. त्याचबरोबर ‘शोध स्वत:चा’ ही लेख स्पर्धा घेतली असता सख्या लिहित्या झाल्या. वुमन्स बाइक रॅलीमध्ये ग्रुपमधील १०० मैत्रिणींनी सहभाग घेऊन. पहिला नंबर पटकावला. याशिवाय काळा राममंदिरात चैत्र महिन्याचे औचित्य साधून सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रम करण्यात आला. चैत्रगौरीचे हळदी-कुंकू व गौरींचे खेळ खेळले याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मदर्स डे वेगळ्या रीतीने साजरा केला. असे अनेक प्रकारचे उपक्रम ठेवा संस्कृतीच्या ग्रुपमधून राबविण्यात आले. प्रत्येक महिन्याला एक असा उपक्रम हा ग्रुप राबवत असतो. त्याचे वेगळेपण जपत साजरे करतात. ग्रुपतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री हेमा जोशी व मुख्याध्यापक सुचेता सौंदाणकर यांचा सत्कार करण्यात आला.