शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारींची नोंद ठेवा... अन्यथा कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 01:05 IST

सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजासंदर्भात असलेल्या तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक उपविभागीय कार्यालयांमध्ये व्हॉट््सअ‍ॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू करण्यात आलेली आहे. तथापि, अनेक नागरिकांच्या तक्रारींची नोंद न घेता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जाते. सर्वसामान्यांच्या तक्रारींची रितसर नोंद न ठेवणाºया तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाईल, असे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाºयांना बजावले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : व्हॉट्सअ‍ॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजासंदर्भात असलेल्या तक्रारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक उपविभागीय कार्यालयांमध्ये व्हॉट््सअ‍ॅप ग्रिव्हनसेस फेडरल योजना सुरू करण्यात आलेली आहे. तथापि, अनेक नागरिकांच्या तक्रारींची नोंद न घेता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले जाते. सर्वसामान्यांच्या तक्रारींची रितसर नोंद न ठेवणाºया तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाईल, असे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाºयांना बजावले आहे.शासकीय कार्यालयात असलेल्या प्रकरणासंदर्भात शासकीय कामाचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाभरातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. येथे आल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी फिरावे लागते. यातच त्यांचा दिवसही खर्ची होतो. त्यामुळे त्यांना तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने एक व्हॉट््सअ‍ॅप क्रमांक दिलेला आहे. तसेच प्रत्येक उपविभागीय कार्यालयांच्या स्तरावरदेखील व्हॉट््सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन त्यांचे समाधान करणे हा त्या मागचा हेतू आहे. परंतु अजूनही जिल्हाभरातून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. स्थानिक पातळीवर त्यांच्या तक्रारींची कोणतीही नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासंदर्भात आणि त्यांचे प्रकरण कुठपर्यंत आले आहे याची माहिती प्रत्येक तक्ररींची नोंद करून तक्रार निकाली काढण्यात आली की प्रलंबित आहे याची माहिती तक्रारकर्त्याला मिळाली पाहिजेच शिवाय त्याचे समाधान करणेदेखील अपेक्षित असून, जिल्ह्णातील सहायक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी तक्रारींची नोंद आणि कामाचे प्राधान्य तक्रारकर्त्यांना कळविणे अपेक्षित आहे. असे न झाल्यामुळे अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संंबंधित अधिकाºयांना तक्रारींची नोंद ठेवा अन्यथा जबाबदार धरण्यात येईल, असे पत्र अधिकाºयांना बजावले आहे. तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांच्या तक्रारीची नोंद आॅनलाइन घेण्यात आलेली नसेल आणि संबंधितास तक्रारींची सद्यस्थिती कळविली नसेल अशा अधिकाºयांवर यापुढे जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी अधिकाºयांना कळविले आहे.

टॅग्स :Governmentसरकार