शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

हॉटेलमधील शौचालये खुली ठेवणे कायद्यानेच बंधनकारक, अ‍ॅक्टमध्ये केलेली तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:36 IST

- संजय पाठक ।नाशिक : अत्यंत कल्पक योजना म्हणून नाशिकमधील हॉटेल्स महिलांना खुली करण्याचा प्रस्ताव देऊन पाठ थोपटून घेणाºया महापालिकेची ही योजना म्हणजे मुळातच ब्रिटिशांनी १८६७मध्ये सराय अ‍ॅक्टमध्ये केलेली तरतूद आहे.पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेने हॉटेल्समधील शौचालये महिलांसाठी खुली करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे जाहीर केले. एका हॉटेल्स संघटनेने त्यास सकारात्मक प्रतिसादही दिला. त्यानुसार ...

- संजय पाठक ।

नाशिक : अत्यंत कल्पक योजना म्हणून नाशिकमधील हॉटेल्स महिलांना खुली करण्याचा प्रस्ताव देऊन पाठ थोपटून घेणाºया महापालिकेची ही योजना म्हणजे मुळातच ब्रिटिशांनी १८६७मध्ये सराय अ‍ॅक्टमध्ये केलेली तरतूद आहे.पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेने हॉटेल्समधील शौचालये महिलांसाठी खुली करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे जाहीर केले. एका हॉटेल्स संघटनेने त्यास सकारात्मक प्रतिसादही दिला. त्यानुसार हॉटेल्सच्या बाहेर शौचालये मोफत उपलब्ध असल्याचे फलक लावण्यात येणार आहेत.हैदराबाद आणि दिल्लीनंतर राज्यात नाशिक महापालिकेने असा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. प्रसाधनगृहे आणि शौचालये सर्वांना खुली करणे कायद्याने बंधनकारक आहे आणि ही तरतूद ब्रिटिशकालीन आहे.प्रवासी किंवा यात्रेकरू ज्या जागेचा शुल्क देऊन वापर करतात, ती जागा म्हणजेच सराय. पाणी तर माणसांनाच नव्हे, तर पाळीव प्राण्यांनाही देणे बंधनकारक असल्याचे कायद्यात नमूद करण्यात आहे.मुळात स्वच्छतागृहे आणि पाण्याची सुविधा देणे बंधनकारक असताना नियम डावलणाºयांवर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र महापालिकेने स्वत:चेच ढोल वाजवून घेतले.२०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात २६ महत्त्वाचे मानवाधिकार स्पष्ट केले असून, त्यात सराय अ‍ॅक्टमधील कलम ७मधील तरतुदींचा उल्लेख आहे. मात्र, नागरिक या कायद्याविषयी अनभिज्ञ आहेत.‘यांना’ नोंदणी आवश्यकविशेष म्हणजे हॉटेल्स आणि लॉजिंग, बोर्डिंगची व्यवस्था असलेल्यांनी सराय अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र हॉटेल्सच्या नोंदीच होत नसल्याचे चित्र आहे.ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यातील पाणी उपलब्धतेची अडचण अनेक हॉटेल व्यावसायिकांना खटकते आहे. १९९८-९९ मध्ये ती निरस्त करण्याचा प्रयत्नदेखील सरकारच्या माध्यमातून झाला आहे.