शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात उन्हाळ कांदा आवक टिकून

By admin | Updated: June 19, 2017 00:45 IST

बाजारभाव स्थीर : गव्हाची आवक घटली; तुरीला व्यापाऱ्यांची मागणी कमी

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : गेल्या सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती; मात्र बाजारभाव घसरल्याचे चित्र होते. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांत व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापूर इत्यादी ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकूण कांदा आवक ४५५७५ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २०० ते ५०२, तर सरासरी ४७५ रुपये प्रतिक्विंटल पर्यंत होते. उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक १९८१९ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे भाव किमान २०० ते कमाल ५१०, तर सरासरी ४७५ रुपये प्रतिक्विंटल पर्यंत होते.सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे चित्र होते. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकुण आवक ७२ क्विंटल झाली. बाजारभाव किमान रु. १४७४ ते कमाल १७०१ तर सरासरी१५४१ रुपयांपर्यंत होते. हरभरा : सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. हरबऱ्यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात हरभऱ्याची एकूण आवक २९ क्विंटल झाली. बाजारभाव किमान ३६५३, कमाल ६०००, तर सरासरी ४९८९ रुपयांपर्यंत होते. सप्ताहात तुरीच्या आवकेत घट झाली. तुरीस व्यापारी वर्गाची मागणी कमी राहिल्याने बाजारभावात घसरण झाली.सप्ताहात तुरीची एकुण आवक १६ क्विंटल झाली . बाजारभाव किमान . २८०० कमाल ३४२२ तर सरासरी ३२५० पर्यंत होते.सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली. बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सोयाबीनला व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण असल्यामुळे बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात सोयाबीनची एकुण आवक ३६ क्विंटल झाली . बाजारभाव किमान २४०० कमाल २६९१ तर सरासरी २६४२ पर्यंत होते.