शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीसाठी यंत्रणा सज्ज ठेवा :  राजाराम माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:21 IST

पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी जिल्हास्तरावर जलद प्रतिसाद यंत्रणा तयार ठेवावी असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले.

नाशिकरोड : पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी जिल्हास्तरावर जलद प्रतिसाद यंत्रणा तयार ठेवावी असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले.विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक विभागीय मान्सूनपूर्व आढावा बैठकीत माने बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, डॉ. बी.एन.पाटील, विनय गौडा, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, अर्जुन चिखले, नंदुरबार अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, मुख्य अभियंता एच. एस. पगारे, तहसीलदार बबन काकडे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना माने म्हणाले ेकी, जिल्हा पातळीवर अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार प्रतिसादाविषयी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्या. नियंत्रण कक्षात सर्व संबंधित यंत्रणांचे दूरध्वनी क्रमांक अद्ययावत ठेवावेत. अतिवृष्टीच्या काळात दरड कोसळल्यामुळे बाधीत होणारी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे माने यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांनी आपत्ती संदर्भात आपल्या कार्यक्षेत्राची माहिती करून घेत आपत्तीच्या वेळी उपयोगात येणाºया यंत्रसामुग्रीची पडताळणी करून आवश्यक असल्यास दुरुस्ती करावी. पूरपरिस्थितीत मदत कार्यासाठी उपयुक्त व्यक्ती आणि संस्थाची माहिती तयार ठेवावी. आपत्तीसाठी प्रमाणित कार्यपद्धती अद्ययावत ठेवण्याचे निर्देशही माने यांनी दिले.यावेळी उपायुक्त दिलीप स्वामी यांनी अतिवृष्टीच्या वेळी पुरामुळे बाधीत होणाºया गावांकडे विशेष लक्ष देण्यात यावे. पूर परिस्थितीत आरोग्य सुविधा तयार ठेवाव्यात. महापालिका क्षेत्रात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी. जलद प्रतिसाद देण्यासाठी मनुष्यबळाचे नियोजन तयार ठेवावे. आपत्तीत मदत करणाºया संस्थांची माहिती संकलित करून त्यांच्याशी पावसाळ्यापूर्वी संवाद साधावा. पाझर तलाव, बंधारे यांची दुरुस्ती करून घ्यावी. आपत्तीच्या वेळी सामुग्रीचे संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे, असे स्वामी यांनी सांगितले. बैठकीला संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :droughtदुष्काळcommissionerआयुक्त