शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

मनपाची बससेवा हद्दीतच ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:10 IST

रस्त्यातील झाडांचा अडथळा हटवा नाशिक : रस्त्याच्या मधोमध असलेल्या वृक्षांमुळे अनेकांचा जीव गेला आहे. रस्त्याच्या मधोमध येणारे आणि अपघाताला ...

रस्त्यातील झाडांचा अडथळा हटवा

नाशिक : रस्त्याच्या मधोमध असलेल्या वृक्षांमुळे अनेकांचा जीव गेला आहे. रस्त्याच्या मधोमध येणारे आणि अपघाताला निमंत्रण ठरणारे वृक्ष हटविण्यात यावेत अशी मागणी सचिन वाघ यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाघ यांचा मुलगा आदित्य याचा गंगापूररोडवर झाडाला आदळून अपघातात मृत्यू आला आहे. गंगापूर पोलीस ठाण्याच्या रेकाॅर्डनुसार रस्त्यातील झाडांमुळे जवळपास २५ जणांना जीव गमवावा लागला आहे. गंगापूररोड पेठरोड दिंडोरीरोड, मखमबलाबाद, सिडको तसेच शहरातील अन्य भागात रस्त्यातील मधोमध असलेली झाडे हलवावीत अशी मागणी वाघ यांनी निवेदनात केली आहे.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९६ टक्के

नाशिक : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याचे चित्र असले तरी जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. धोका अजूनही टळला नसल्याने नागरिकांनी दक्षता घेतली पाहिजे अशा सूचना वारंवार प्रशासनाकडून केल्या जात आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९६.६८ टक्के इतके आहे. शहरात हेच प्रमाणे ९७.९७ टक्के इतके आहे. मालेगावमध्ये ९६.७५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४४ टक्के इतके आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण ९७.४३ टक्के इतके आहे.

वृद्धाश्रम परिसरात शंभर वृक्षारोपण

नाशिक : दि नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड नाशिक आणि टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नॅब संचलित वृद्धाश्रम, बेळगाव ढगा परिसरात शंभर वृक्षांचे रोपण करण्यात आले. टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एन. बी. मोरे, सचिव सोनवणे, प्रकाश विसपुते, अक्षय सोनजे यांच्यासह नॅबचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाशचंद्र सुराणा, माजी अध्यक्षा निर्मलाबेन शहा, जयप्रकाश कोटकर, डॉ. टेंभे, नॅबच्या अध्यक्षा ॲड. विद्युलता तातेड, उपाध्यक्ष संगीताबेन शहा, अनिल चव्हाण, विजय टाटीया, ॲड. वसंतराव तोरवणे, शितलभाऊ सुराणा, विशाल सेदाणी, विष्णू ढगे आदी उपस्थित होते.

(फोटो स्कॅनिंगला)

दुचाकी उचलण्याच्या प्रकारावरून तक्रारी

नाशिक : शहरात टोईंग सुरू होऊन अवघे चार दिवस होत नाहीत तोच वाहने उचलण्याच्या प्रकारावरून वादाचे प्रसंग उद‌्भवत आहेत. टोईंग वाहनावरील कर्मचारी ज्या पद्धतीने दुचाकी उचलतात त्यावरून दुचाकी मालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. जिल्हा न्यायालयाबाहेर वाहने उचलताना अनेकांशी वाद होत आहेत. वाहनाचे मडगार्ड, आरसे डॅमेज होण्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून केल्या जात आहे. नुकसान भरपाईची तरतूद असली तरी गाडीला क्रॅश कधी आला हे सिद्ध करणे कठीण असल्याने वाहनधारकांना नुकसान सहन करावे लागत आहे.

(फोटो०७पीएचजेएल७९)