शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

सफाई कामगारांचे पालिकेसमोर धरणे

By admin | Updated: March 4, 2015 23:42 IST

आऊटसोर्सिंगला विरोध : भरतीप्रक्रिया राबविण्याची मागणी

नाशिक : शहरातील साफसफाई आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यास सफाई कामगारांनी तीव्र विरोध दर्शवित भरतीप्रक्रिया राबविण्याच्या मागणीसाठी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी वाल्मीकी, मेघवाळ, मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदनही देण्यात आले. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सफाई कामगारांसह वाल्मीकी, मेघवाळ आणि मेहतर समाजबांधवांनी महापालिकेसमोर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व सुरेश दलोड, सुरेश मारू, महेशकुमार ढकोलिया, प्रवीण मारू, ताराचंद पवार, अनिल बेग, यशवंत बोरिचा आणि रमेश मकवाणा यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने सफाई कामगार सहभागी झाले होते. यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिका साफसफाईचे काम ठेकेदारी पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पारंपरिक सफाईची कामे करणाऱ्या समाजावर अन्याय होणार आहे. येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविक शहरात दाखल होणार असल्याने आणि महापालिकेकडे साफसफाईसाठी तुलनेत कमी कामगार असल्याने अडचणी उद्भवणार आहेत. महापालिकेने सफाई कामगारांची पदे मंजुरीचा प्रस्ताव पाठवूनही शासनाने सदरची कामे ठेकेदारी पद्धतीनेच करण्याचा घाट घातला आहे. महापालिकेने साफसफाई कामाचे आऊटसोर्सिंग न करता शासनाकडून नोकरभरतीसाठी परवानगी मिळवावी आणि वंशपरंपरेने सफाईची कामे करणाऱ्या समाजातील लोकांनाच भरतीत प्राधान्य द्यावे. निवेदनात मुख्यमंत्री फडणवीस यांचाही निषेध करण्यात आला असून, लवकरात शासनाने मान्यता न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. आयुक्तांनी याबाबत माहिती घेऊन लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)