शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

केबीएच विद्यालय : ‘मी कायदा पाळणार अन् सक्षम नागरिक होणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:17 IST

निमित्त होते, ‘छोटा पोलीस’ उपक्रमाचे. पोलीस आयुक्तालय, शहर वाहतूक नियंत्रण शाखा व आदिवासी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने वडाळागावातील केबीएच विद्यालयात बुधवारी (दि.५) आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देकायद्याचे पालन करणे ही आपली प्रथम जबाबदारी शिक्षक-आईवडीलांचा आदर करत त्यांच्या सूचनांचे पालन करा

वडाळागाव : ‘मी कायदा पाळणार अन् सक्षम नागरिक होणार’ असा संकल्प ‘पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्यासमवेत वडाळागावातील क र्मविर भाऊसाहेब हिरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोडला.निमित्त होते, ‘छोटा पोलीस’ उपक्रमाचे. पोलीस आयुक्तालय, शहर वाहतूक नियंत्रण शाखा व आदिवासी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने वडाळागावातील केबीएच विद्यालयात बुधवारी (दि.५) आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने प्रथमच सिंगल यांनी वडाळ्यातील शाळेला भेट देत तेथील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. शहरातील शाळा-महाविद्यालयांना भेटी देत जनजागृतीपर उपक्रम राबविणारे पोलीस आयुक्त प्रथमच वडाळ्यातील या माध्यमिक विद्यालयात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालिचा उत्साह पहावयास मिळाला. व्यासपिठावर शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अशोक नखाते, पोलीस निरिक्षक नारायण न्याहाळदे, विनायक लोहकरे, माजी मुख्याध्यापक राजेश बडोगे, सामाजिक कार्यकर्ते सुनील माधव खोडे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी सिंगल विद्यार्थ्यांना उद्देशून म्हलाले, या देशाचे आपण भावी नागरिक आहोत. आदर्श नागरिक होण्यासाठी कायद्याचे पालन करणे ही आपली प्रथम जबाबदारी आहे. आपल्या आजुबाजुला बेकायदेशीर वर्तणूक होत असेल तर त्याची माहिती सर्वप्रथम आई-वडिलांना द्या त्यानंतर शिक्षकांना व त्यांच्यामार्फत पोलिसांपर्यंत पोहचवा, त्यावर पोलीस कायदेशीर कारवाई नक्कीच करतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या आई विडलांना अभिमान वाटेल असे काम करा .आपल्या शिक्षकांचा व आईवडीलांचा आदर करत त्यांच्या सूचनांचे पालन करा त्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करुन दाखवा. शालेय वयातच आपले ध्येय निश्चित करण्याचा प्रयत्न करावा, असा मौलिक सल्ला सिंगल यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या देशाचे जबाबदार नागरिक अधिकारी पदावर सेवा देत असल्याची अनेक उदाहरणे आपल्यापुढे असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक के दारे यांनी केले. सुत्रसंचालन डी.एस.अहिरे यांनी केले व आभार एम.आर.बाविस्कर यांनी मानले.

टॅग्स :ravindrakumar singhalरविंद्रकुमार सिंगलnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयSchoolशाळा