शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काजी गढी संरक्षित, तरी असंरक्षित

By admin | Updated: August 26, 2016 00:17 IST

लवकरच लावणार फलक : १९५० पासून भारतीय पुरातत्त्व विभागाच्या यादीत समाविष्ट

नाशिक : जुने नाशिकमधील काजीची गढी ही भारतीय पुरातत्त्व विभागाने १९५० मध्येच संरक्षित वास्तू म्हणून घोषित केली आहे; मात्र अद्याप गढी असंरक्षित असून, काळानुरूप असुरक्षितही बनली आहे. पुरातत्त्व विभागाने नाशिकमधील सदर वास्तू ‘जुनी मातीची गढी’ या नावाने संरक्षित वास्तू म्हणून नोंदविली आहे.शहरी लोकवस्तीमधील अत्यंत संवदेनशील वास्तू म्हणून भारतीय पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद कार्यालयाने काजी गढीचे वर्गीकरण ‘क’ गटात केले आहे. गढीचे मालक कोण? असा प्रश्न जिल्हा प्रशासनाने महापालिका प्रशासनाला विचारला होता. त्यामुळे गढीच्या संरक्षण भिंतीचा मुद्दा बाजूला पडून नवीन वाद चव्हाट्यावर आला होता. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बचत निधीमधून गढीला संरक्षण भिंत बांधण्याची तयारी पालिकेने करत तसा प्रस्ताव जलसंपदा व जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता; मात्र अद्याप या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी सांस्कृतिक मंत्रालयाकडे याबाबत तक्रार केली होती. सदर तक्रार थेट औरंगाबाद कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. राज्यातील एकूण २८५ ठिकाणे जे राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत, अशा भारतीय पुरातत्त्व विभागाच्या यादीत १५४व्या क्रमांकावर नाशिकची ‘जुनी मातीची गढी’ म्हणून काजी गढीचा उल्लेख आहे. सर्वेक्षण करून लवकरच या ठिकाणी संरक्षित वास्तूचा फलक पुरातत्त्व विभागाकडून लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.कागदोपत्री १९५० पासून गढी संरक्षित जरी असली तरी त्या दृष्टीने पुरातत्त्व खात्याने उपाययोजना अद्याप केल्या नाहीत. त्यामुळे गढी असंरक्षित राहिली तसेच ती असुरक्षितही बनली आहे. (प्रतिनिधी)