शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कावनई, टाकेदला आजपासून संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:21 IST

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इगतपुरी तालुक्यातील धार्मिक स्थळे असलेल्या श्री क्षेत्र कावनई व सर्वतीर्थ टाकेद येथे यात्रा कालावधीत तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पाश्व’भूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

ठळक मुद्देप्रशासनाचा निर्णय : महाशिवरात्रीची यात्रा रद्द 

घोटी : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इगतपुरी तालुक्यातील धार्मिक स्थळे असलेल्या श्री क्षेत्र कावनई व सर्वतीर्थ टाकेद येथे यात्रा कालावधीत तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पाश्व’भूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत इगतपुरी तहसिल प्रशासन, तालुका आरोग्य विभाग व घोटी पोलिसांना  सूचना देण्यात  आल्या आहेत. नागरिकांना दोन्ही धार्मिक स्थळी येण्यास बंदी असणार आहेत. त्याचप्रमाणे फराळ वाटप, पूजा विधी हे कार्यक्रम देखील बंद करण्यात आले आहेत.  दरम्यान प्रशासनाने व्यापारी व स्थानिक नागरिकांना दुकाने बंद करण्याच्या सूचना  दिल्या आहेत.यापूर्वी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले,घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सर्वतीर्थ टाकेद संस्थानचे महंत श्री किशोरदास श्रीवैष्णव, महंत फलहारी महाराज, महंत उडिया महाराज, कावनईचे ट्रष्टी कुलदीप चौधरी यांनी  बैठक घेऊन  यात्रा उत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मंदिरही राहणार बंददि.१० ते १३ मार्च पर्यंत टाकेद तीर्थ पूर्णपणे मंदिरांसह बंद राहणार असून या पाच दिवस टाकेद तीर्थावर स्थानिक ग्रामपंचायत, मंदिर संस्थान,पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे.  नियम तोडून कोणी गैरवर्तन केल्यास सदर व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकTempleमंदिर