शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

वर्गसंघर्ष मांडणारे ‘काठपदर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:45 IST

कामगार आणि भांडवलदार यांचा शेकडो वर्षांपासून चालत आलेला वर्गसंघर्ष मांडणारे ‘काठपदर’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत शनिवारी सादर झाले. नाटकाचा विषय रूपकात्मक पद्धतीने मांडण्याचा लेखक आणि दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला.

नाशिक : कामगार आणि भांडवलदार यांचा शेकडो वर्षांपासून चालत आलेला वर्गसंघर्ष मांडणारे ‘काठपदर’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत शनिवारी सादर झाले. नाटकाचा विषय रूपकात्मक पद्धतीने मांडण्याचा लेखक आणि दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला.परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या ५९व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेत शनिवारी कृतिशील निवृत्त संस्थेच्या काठपदर या नाटकाचे सादरीकरण झाले. नाटकातील कथा मालकीणबाई आणि त्यांच्या दोन मोलकरणी छबी आणि बबी यांच्या भोवती फिरते. छबी आणि बबी या दोघींचे मालकीण व्हायचे स्वप्न असते. मालकिणीच्या गैरहजेरीत या दोघी मालकिणीच्या साड्या नेसून मेक अप कीट वापरत मालकिणीच्या भूमिकेतही जायच्या. मालकिणीची जागा घेण्यासाठी या दोघी त्यांचा जीवदेखील घेण्याच्या प्रयत्नात असतात. या दोघी आपल्या गरिबीच्या आयुष्याला कंटाळलेल्या त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याची आकांक्षा दिवसेंदिवस वाढत जाते. त्यात मालकिणीच्या छळाला त्या कंटाळलेल्या, त्यामुळे मालकिणीचा जीव घेण्याचा त्या दोघी कट रचतात. मग मालकिणीला चहामधून विष द्यायचे निश्चित होते. मालकिणीसाठी चहा बनवला जातो. पण नाटकात काही गोष्टी अशा घडत जातात की, मालकीण तो चहा पित नसल्याने चहा तसाच टेबलावर राहून जातो. याचदरम्यान मालकीण आता मरणार आणि मग मालकीण कोण होणार यावरून दोघींमध्ये बाचाबाची होऊन त्या दोघी अनवधानाने त्या कपातला अर्धा अर्धा चहा पितात आणि मरतात, असे नाटकाचे कथानक आहे.नाटकाचे लेखन प्रा. दिलीप जगताप यांचे, तर दिग्दर्शन आरती प्रभू हिरे यांचे होते. नेपथ्य गणेश सोनवणे, प्रकाश योजना रवि रहाणे यांचे होते. वैशाली खाटीक मोरे यांनी नाटकाला संगीत दिले. वेशभूषा प्रणिल तिवडे, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात मनीषा शिरसाट (बबी), कविता अहेर (छबी), स्वाती शेळके (बाईसाहेब) या कलाकारांनी भूमिका साकारल्या. सुभाषचंद्र येवले व सुनंदा जरांडे यांनी निर्मिती साहाय्य केले.आजचे नाटक :आम्ही नाटक करतो म्हणजेदुपारी १२.३0 वाजता.प्रार्थनासूक्त- सायंकाळी ७ वाजता.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNatakनाटक