शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कथक नृत्याविष्काराने रसिक दंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:12 IST

पहिल्या दिवशी अहिरभैरव रागातील तराणा कथक नृत्याविष्कारानंतर आवर्तन संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी ‘दश-धा’ नृत्याविष्काराच्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली.

नाशिक : पहिल्या दिवशी अहिरभैरव रागातील तराणा कथक नृत्याविष्कारानंतर आवर्तन संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी ‘दश-धा’ नृत्याविष्काराच्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली.नृत्यांगण कथक नृत्य संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त परशुराम साईखेडक र नाट्यगृहात मंगळवारी (दि.१३) कृतज्ञता सोहळ्यात ‘विशारद पूर्ण’ पदवी प्राप्त करणाºया निहारिका देशपांडे, गंधाली खेडलेकर आणि सावनी बंकापुरे यांच्यासह संस्थेच्या प्रवासात योगदान देणाºया व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करीत त्यांना सन्मानित करण्यात आले.प्रारंभी ‘जय जयती गजवदन’ या गणेशवंदनेने सोहळ्याची सुरुवात झाली. दुसºया सत्रात कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी ‘दश-धा’ ही नृत्यप्रस्तुती सादर करताना ‘दश-धा’ या दहा मात्रांचा झपताल सादर केला. त्यानंतर तालअंगात थाट, उठान, आमद, परणजुडी आमद, तोडे, परण, चक्र दार परण, ततकार हा कथकचा पारंपरिक वस्तुम सादर करून रसिकांची मने जिंकली. तबल्यावर कल्याण पांडे व वैष्णवी भडकमकर यांच्यासह हार्मोनियम व गायन पुष्कराज भागवत आणि सिंथेसायझरसह अनिल धुमाळ यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन किशोरी किणीकर यांनी केले.त्रिपल्ली, गिनतीची तिहाई नृत्याविष्काराचा आस्वाद घेताना रसिक दंग झाले. सवाल-जवाब या प्रकारालाही रसिकांची विशेष दाद मिळाली. कथकची विशेषता असलेला गतनिकास विद्यार्थिनींनी नजाकतीने प्रस्तुत केला. त्यानंतर अभिनय पक्षात ‘दशावतार’ सादरीकरणाने आवर्तन संगीत सोहळ्याचा समारोप झाला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक