शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

...म्हणून काश्मीर भारताच्या नकाशावर : विनायक आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:56 IST

पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरच्या विमानतळापर्यंत घूसखोरी केली होती. यावेळी मेजर सोमनाथ शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या ७० शूरवीरांच्या तुकडीने १९४७ साली चिवट लढा देत पाकिस्तानी सैन्याला काश्मीरमधून बाहेर काढले, म्हणून आज भारताच्या नकाशावर काश्मीर झळकत असल्याचे प्रतिपादन कमांडर विनायक आगाशे यांनी केले.

नाशिक : पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरच्या विमानतळापर्यंत घूसखोरी केली होती. यावेळी मेजर सोमनाथ शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या ७० शूरवीरांच्या तुकडीने १९४७ साली चिवट लढा देत पाकिस्तानी सैन्याला काश्मीरमधून बाहेर काढले, म्हणून आज भारताच्या नकाशावर काश्मीर झळकत असल्याचे प्रतिपादन कमांडर विनायक आगाशे यांनी केले.गोदाघाटावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचे २१वे पुष्प आगाशे यांनी मंगळवारी (दि.२१) ‘सैनिकाच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग’ या विषयावर गुंफले. भारतीय सैन्यदलातील शूरवीर पराक्रमी अशा हुतात्म्यांच्या शौर्यकथांचे त्यांनी विवेचन केले. यावेळी आगाशे म्हणाले, काश्मीरच्या संरक्षणासाठी शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या जवानांनी दिलेले बलिदान अविस्मरणीय असेच आहे. शर्मा जेव्हा आपल्या ७० जवानांच्या मदतीसाठी धावले तेव्हा ते रुग्णालयात उपचारार्थ दाखल होते. त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. तसेच लेफ्टनंट क र्नल प्रीती चांद यांनी लडाखसारख्या प्रतिकूल वातावरणाच्या प्रदेशात केवळ १८ जवान २०० रायफल घेऊन पाकिस्तानी सैन्यांचा सामना केला. त्यांना महावीर चक्रने सन्मानित करण्यात आले. चांद यांची शौर्यकथाही भारतीय सेनेच्या इतिहासात उल्लेखनीय अशीच असल्याचे आगाशे म्हणाले. भारतीय सेनेत लढणारे सैनिक म्हणून नव्हे तर सपोर्ट स्टाफमध्ये असलेले बूट दुरुस्ती करणारे कारागीर हवालदार सियाराम यांनीही देशसेवा करताना आपल्या ‘शुटिंग’च्या कौशल्याचा अचूक वापर करत भारतीय सेनेला गरज पडली तेव्हा हातात बंदूक घेऊन शत्रूला धडा शिकविला. त्यांची शौर्यगाथाही प्रेरणादायी अशीच असल्याचे त्यांनी सांगितले.सैनिकाचे जीवन सर्वसामान्य माणसापेक्षा कितीतरी पटीने वेगळे असते. सैनिक देशाच्या सीमांचे रक्षणासाठी डोळ्यांत तेल घालून आपले कुटुंब, कौटुंबिक भावना, सुख-चैन अशा सर्व गोष्टी विसरून केवळ देशप्रेमाखातर देशसेवेचे व्रत घेत सैनिकी धर्म निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. भारतीय सेनेच्या इतिहासात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अशा अनेक शूरवीरांच्या शौर्यगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या असल्याचे आगाशे यांनी यावेळी अधोरेखित केले.आजचे व्याख्यानवक्ते : कवी संदीप जगतापविषय : शिवशाही ते लोकशाही

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान