लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : येवला तालुक्यातील राजापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी काशिनाथ चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.राजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिता माळी या रजेवर गेल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज पाहण्यासाठी त्यांच्या जागी उपसरपंच काशिनाथ आनंदा चव्हाण यांची प्रभारी सरपंच म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एस. मंडलिक यांनी काम पाहिले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने काशिनाथ चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सूनिता माळी, प्रवीण बोडके, ताई आव्हाड, मिना अलगट, शशिकला आव्हाड, शरद वाघ, काशिनाथ चव्हाण आदी ग्रामपंचायत सदस्य हजर होते.या निवडी प्रसंगी माजी सभापती पोपट आव्हाड, रमेश वाघ, समाधान चव्हाण, शिवाजी बोडके, बबन अलगट, बबन वाघ, संजय माळी, भाऊसाहेब भाबड, जनार्दन चव्हाण, शंकर मगर, सोपान आव्हाड, मारु ती आंबेकर, संजय वाघ आदी उपस्थित होते.(फोटो ०६ राजापूर)
राजापूर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच म्हणून काशिनाथ चव्हाण बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 17:43 IST
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी काशिनाथ चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिता माळी या रजेवर गेल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज पाहण्यासाठी त्यांच्या जागी उपसरपंच काशिनाथ आनंदा चव्हाण यांची प्रभारी सरपंच म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
राजापूर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच म्हणून काशिनाथ चव्हाण बिनविरोध
ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या वतीने काशिनाथ चव्हाण यांचा सत्कार