शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलर बंद पडल्याने कसारा घाट ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:17 IST

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या रस्त्यावर जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ एक ट्रेलर व ट्रक एकाच वेळी नादुरुस्त झाल्याने सुमारे २ तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, वाहतूक पोलीस वेळेवर न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

इगतपुरी : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या रस्त्यावर जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ एक ट्रेलर व ट्रक एकाच वेळी नादुरुस्त झाल्याने सुमारे २ तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, वाहतूक पोलीस वेळेवर न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.मंगळवारी (दि.११) सकाळी १२ वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणारा महाकाय ट्रेलर(क्र. आरजे ०१ जीए ९०१८) कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ आला असता अचानक बंद पडला. त्यामागून येणारा अवजड ट्रक (क्र. एमएच ०६ एक्यू ३७३१) हादेखील या ट्रेलरला ओव्हरटेक करताना ट्रेलरच्या बाजूलाच बंद पडला. त्यामुळे मागून येणारी वाहतूक पूर्णपणे थांबली. सर्वप्रथम एक्स्प्रेसवेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र वाहतूक पोलिसांना येण्यास उशीर झाला.त्यानंतर एक्स्प्रेसवेचे कर्मचारी, पोलीस व प्रवाशांनी मिळून कंटेनरच्या साह्यााने, ओव्हरलोड ट्रकला हाताने धक्का देत तब्बल २ तासानंतर वाहतूक सुरळीत केली. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे प्रवाशांनी वाहतूक पोलिसांवर संताप व्यक्त केला.क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारे ट्रक बिनदिक्कतपणे दिवसभर कसारा घाटात वाहतूक करतात. याला वाहतूक पोलिसांचा आशीर्वाद असल्याने नेहमी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वाहतूक कोंडी झाल्यावरदेखील पोलीस वेळेवर न पोहोचल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाºया ट्रकवर कारवाई अपेक्षित असताना ती होताना दिसून येत नाही.

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी