शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

नाशकात कामे केली मनसेने, श्रेय घेतले स्मार्ट सिटी कंपनीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 20:13 IST

कंपनीच्या वार्षिक सभेत सादरीकरण : मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागून

ठळक मुद्देसरकारवाड्याचे नूतनीकरण हे पुरातत्व खात्याच्या पाठपुराव्याने झालेले आहे वस्तू संग्रहालय, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण, पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले वनौषधी उद्यान हे मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून सीएसआर उपक्रमांत उभे

नाशिक - मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या सत्ताकाळात वनौषधी उद्यान, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कपासून ते होळकर पुलावरील वॉटर कर्टनपर्यंतची कामे ही स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारला सादर केलेल्या आराखड्यातच समाविष्ट होती. कंपनी स्थापन होण्यापूर्वी महापालिकेने ती राबविली, असा दावा नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने केला आहे. कामांचे श्रेय घेण्याच्या या प्रकाराबद्दल मनसेच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून आहे.नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पाेरेशनची पहिली वार्षिक सभा गुरुवारी (दि.२७) झाली. त्यावेळी, कंपनी स्थापन झाल्यापासून झालेल्या कामांचा आढावा सादर करण्यात आला. त्यात, अहल्यादेवी होळकर पुलावर वॉटर कर्टन (९५ लाख रुपये), घनकचरा व्यवस्थापन (१.४५ कोटी), सरकारवाडा नूतनीकरण (८.५ कोटी), गंगापूररोडवरील बाळासाहेब ठाकरे इतिहास वस्तू संग्रहालय (२ कोटी), ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क (४ कोटी), उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण (१.५० कोटी), नेहरू वनौषधी उद्यान (१२ कोटी), कालिदास कलामंदिर नूतनीकरण (९ कोटी), महात्मा फुले कलादालन नूतनीकरण(३.२ कोटी), नेहरू उद्यान पुनर्विकास (१.२० कोटी), विद्युत दाहिनी(२.७ कोटी), अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका स्मार्ट रोड (१६ कोटी), सोलर पॅनल बसविणे (४.५ कोटी) याशिवाय, पंडित पलुस्कर पुनर्विकास, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, बहुमजली पार्कींग, सीसीटीव्ही यंत्रणा आदी कामांचा समावेश करण्यात आला. या कामांमध्ये सरकारवाड्याचे नूतनीकरण हे पुरातत्व खात्याच्या पाठपुराव्याने झालेले आहे तर इतिहास वस्तू संग्रहालय, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण, पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले वनौषधी उद्यान हे मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून सीएसआर उपक्रमांत उभे राहिलेले आहे. ही वस्तुस्थिती असताना कंपनीने आपण स्वत: केलेल्या कामांच्या यादीत या कामांचा समावेश करत श्रेट लाटण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासंदर्भातील वास्तव पत्रकारांनी अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कंपनीवर महापालिकेचा असलेल्या नोडल अधिका-याने मात्र सदर कामे ही केंद्र सरकारला सादर केलेल्या आराखड्यातीलच असल्याचा दावा केला आहे. स्मार्ट सिटीचे आराखडा बनविण्याचे काम सुरू असताना मनपाने त्या कामांवर खर्च केला असला तरी ती स्मार्ट सिटीच्या यादीत होती, असेही या नोडल अधिका-याने स्पष्ट केले. त्यामुळे श्रेय लाटण्याच्या या प्रकाराला आता मनसे कशा पद्धतीने प्रत्युत्तर देते, याकडे लक्ष लागून असणार आहे.दोन वर्षांत कामे दिसतीलकालिदासचे नूतनीकरण, नेहरु उद्यानाचा पुनर्विकास, फुले कलादालनाचे नूतनीकरण ही कामे महापालिकेने कंपनीकडे वर्ग केलेली आहेत. त्यानुसार कंपनीच्या निधीतून सदर कामे सुरू असल्याची माहिती कंपनीमार्फत देण्यात आली. दरम्यान, ब-याच प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया सुरू असून येत्या दोन वर्षांत बरीच कामे प्रत्यक्षात दिसू लागतील, असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका