नाशिक : जिल्'ातील ढकांबे गावचा रहिवासी व नाशिक तालीम संघाचा कुस्तीपटू राहुल बोडके याने महाराष्ट्राचे नेतृत्व करताना कर्नाटकातील बेळगाव येथे झालेल्या स्पर्धेत कर्नाटक केसरीचा मान पटकावला़ राज्यातील मल्लाने प्रथमच हा मान पटकावला आहे़ रविवारी बेळगाव येथे कर्नाटक केसरी या स्पर्धा पार पडल्या़ या स्पर्धेत महाराष्ट्रासह पश्चिम भारतातील अनेक मल्लांनी सहभाग घेतला होता़ महाराष्ट्राचे नेतृत्व करताना अंतिम लढतीत राहुल बोडके याने कर्नाटकच्या मल्लाला आसमंत दाखवत कर्नाटक केसरीची गदा आपल्या नावावर केली़ पाच किलो चांदीची गदा व रोख पाच लाख रुपये असे या किताबाचे स्वरूप आहे़ यापूर्वी राहुल बोडके याने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे़ त्याची आगामी हिंद केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ फ ोटो क्ऱ - 06पीएचओटी11 फ ोटो ओळी - कर्नाटक केसरीचा किताब स्वीकारताना कुस्तीपटू राहुल बोडके ़ समवेत खासदार प्रकाश हुक्की, माजी आमदार काका पाटील़
बोडके कर्नाटक केसरीचा मानकरी राज्याला पहिलाच मान
By admin | Updated: October 6, 2014 23:16 IST