शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कपालेश्वराच्या चांदीच्या मुखवट्याची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:31 IST

श्रावण मासानिमित्त पंचवटीतील शिवमंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रामकुंडावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिर तसेच जुना आडगाव नाका येथील श्रीकृष्णतीर्थ आश्रमात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.

पंचवटी : श्रावण मासानिमित्त पंचवटीतील शिवमंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रामकुंडावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिर तसेच जुना आडगाव नाका येथील श्रीकृष्णतीर्थ आश्रमात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. कपालेश्वर मंदिरातून सायंकाळी पंचमुखी चांदीच्या मुखवट्याची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  पहाटे भाविकांसाठी श्री कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर सकाळी महादेवाच्या पिंडीला रुद्राभिषेक करण्यात आला. मंदिरातील पुजारी तसेच ब्रह्मवृंदांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीचे पूजन व महाआरती करण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिरात येणाºया भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून दक्षिण दरवाजाने प्रवेश देण्यात येऊन उत्तर दरवाजाने बाहेर निघण्याची व्यवस्था केली होती. श्रावण मासानिमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर व मंदिराच्या गाभाºयात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळी कपालेश्वर मंदिरातून महादेवाच्या पंचमुखी मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या पालखीत पंचमुखी मुखवटा ठेवण्यात आला होता.  कपालेश्वर मंदिरातून पालखी अंबिका चौक, मालवीय चौक, शनि चौक, काळाराम मंदिर, सरदार चौक, गंगाघाट, साईबाबा मंदिर परिसरातून काढण्यात येऊन रामकुंडावर पूजन आरती करण्यात आल्यानंतर कपालेश्वर मंदिरात महाआरतीने पालखीचा समारोप करण्यात आला. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सकाळी ते रात्री उशिरापावेतो मंदिराला प्रदक्षिणा घालण्यास मनाई करण्यात आली होती. दर्शनासाठी येणारे भाविक महादेवाचा गजर करत असल्याने कपालेश्वर मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.  जुना आडगाव नाका येथील श्रीकृष्णतीर्थ आश्रम विश्वनाथ महादेव मंदिरात श्रावणनिमित्त पूर्ण महिनाभर सव्वालाख मातीचे पार्थिव शिवलिंग तयार केले जात असून, रामतीर्थ महाराज यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.मातुलेश्वर मंदिरमातोरी येथील मातुलेश्वर महादेव मंदिरात दुसºया श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील ऐतिहासिक वारसा लाभलेले एकमेव मंदिर असून, गावातील व परिसरातील मंडळींची सकाळ ही मातुलेश्वराच्या दर्शनानेच होते. मंदिरात दररोज शिवभक्तांकडून जनार्दन स्वामी व शिवआरती केली जाते तर शिव पिंडीवर रामकुंडावरील पाणी वर्षभर सोडण्यात येते. मंदिराची रचना पुरातन असून, श्रावण मासानिमित्त मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक