शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कपालेश्वर मंदिर तीन दिवस भाविकांसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:15 IST

गंगाघाटावर कपालेश्वर मंदिर असून दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो शिवभक्त मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी करतात. संपूर्ण देशभरात गेल्या वर्षी कोरोना ...

गंगाघाटावर कपालेश्वर मंदिर असून दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो शिवभक्त मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी करतात. संपूर्ण देशभरात गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. संसर्ग रोखण्यासाठी शासनाने गेल्या वर्षी अनेक दिवस सर्वच मंदिरे तसेच धार्मिक स्थळ बंद ठेवली होती. काही दिवसांनी संसर्ग कमी झाल्याने शासनाने नियम व अटीशर्ती व मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. मंदिरे खुली होताच शेकडो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी पूर्वीप्रमाणे गर्दी केली असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा रुग्ण वाढल्याने तसेच गर्दीच्या ठिकाणी संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सलग तीन दिवस भाविकांना मंदिरात दर्शनासाठी मनाई केली आहे. त्यानुसार बुधवार, गुरुवार व शुक्रवार हे तीन दिवस कपालेश्वर मंदिर खुले असले तरी भाविकांना मुख्य मंदिरात दर्शनासाठी जाता येणार नाही.

गुरुवारी महाशिवरात्रीला मंदिरातील मोजक्या पुजारी, गुरव वर्गाच्या उपस्थितीत कोरोना नियम पालन करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडावे, अशा सूचना पंचवटी पोलीस ठाण्यातर्फे लेखी स्वरूपात देण्यात आल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची कपालेश्वर मंदिरात गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी कपालेश्वर मंदिर विश्वस्त गुरव तसेच पुजाऱ्यांची बैठक घेऊन पोलीस प्रशासन सूचना करणार आहे.