शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

श्रावण मासातही कपालेश्वर मंदिर बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 01:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोमवार (दि. ९) पासून सुरू होत असलेल्या श्रावण मासातही कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याने यंदाही भाविकांना श्रावणात दर्शनापासून मुकावे लागणार आहे. मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिराकडे येणारे रस्ते भाविकांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मात्र काेरोनाचे नियम पाहता, मुख्य मंदिरात मंदिरातील पुजारी व गुरवांना श्रावण महिन्यात नित्यनियमाने पूजन करण्यास मुभा देण्यात आली आहे.

ठळक मुद्देमंदिर मार्गावर बॅरेकेडींग : गर्दी टाळण्याच्या उपाययोजना

पंचवटी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोमवार (दि. ९) पासून सुरू होत असलेल्या श्रावण मासातही कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याने यंदाही भाविकांना श्रावणात दर्शनापासून मुकावे लागणार आहे. मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिराकडे येणारे रस्ते भाविकांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मात्र काेरोनाचे नियम पाहता, मुख्य मंदिरात मंदिरातील पुजारी व गुरवांना श्रावण महिन्यात नित्यनियमाने पूजन करण्यास मुभा देण्यात आली आहे.

यासंदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी मंदिर पुजारी व विश्वस्तांची बैठक घेऊन

भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने नियम शिथिल केले आहेत. त्यातच श्रावण महिना सुरू होत असल्याने देवदेवतांची मंदिरे भाविकांना देवदर्शनासाठी खुली करावी, अशी मागणी भाविक, पुजारी आणि साधू-महंतांनी केली होती. श्रावण महिन्यात भाविक विविध पूजाविधी, अभिषेकपूजन करत असल्याने दरवर्षी भाविकांची महादेव मंदिरात गर्दी व्हायची, मात्र यंदा सलग दुसऱ्या वर्षीदेखील कोरोना सावट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वच मठ, मंदिरे बंद ठेवण्याच्या मंदिर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार यंदाही श्रावण महिन्यात मठ, मंदिरे बंद राहणार असल्याने भाविकांना लांबून देवदर्शन घ्यावे लागणार आहे.

इन्फो==== मंदिर मार्गावर बॅरिकेडिंग

येत्या सोमवारपासून श्रावण महिना सुरू होणार असून, शासनाने कोरोना खबरदारी म्हणून मंदिरे सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही, तरीदेखील दर सोमवारी व शनिवारी शेकडो भाविक कपालेश्वर मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी गर्दी करतात. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग केले जाणार आहे.

अशोक भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

टॅग्स :NashikनाशिकReligious Placesधार्मिक स्थळे