शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैया कुमारची सभा होणारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:48 IST

आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार यांची सभा शहरात होणारच, असा निर्धार ‘संविधान जागर’च्या वतीने करण्यात आला आहे.

नाशिक : आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार यांची सभा शहरात होणारच, असा निर्धार ‘संविधान जागर’च्या वतीने करण्यात आला आहे. सभेच्या परवानगीचा अर्ज पोलीस आयुक्तालयासह मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.गोदाकाठावरील यशवंतराव महाराज पटांगणावर सभेची परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर आता मुंबई नाका येथील तुपसाखरे लॉन्स हे सभेचे ठिकाण निश्चित करण्यात आल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे. याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्याकडे परवानगी अर्जही देण्यात आला आहे. सभेसाठी अंदाजे पंधरा हजार विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आल्याचे नंदवाळकर यांनी सांगितले. त्यामुळे संयोजकांनी निश्चित केलेले मुंबई नाका येथील तुपसाखरे लॉन्स हे ठिकाण सभेसाठी अपुरे पडणार असल्याची कल्पना पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात संयोजकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने नोटीस देऊन सभेसाठी आलेल्या नागरिकांची कुठल्याही प्रकारे झालेल्या गैरसोयीबाबत संयोजक संघटना जबाबदार राहणार असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात येणार असल्याचे नंदवाळकर यांनी सांगितले. सभेसाठी नेहमीप्रमाणे पोलीस ठाण्याचा बंदोबस्त पुरविला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘जेएनयू’च्या आंदोलनापासून कन्हैया प्रकाशझोतात आले. भारतीय विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांनी फेडरेशनची स्थापना केली. याअंतर्गत शहरातील पुरोगामी विचारांच्या सहा संघटनांनी एकत्र येऊन कन्हैया कुमार यांची सभा शहरात आयोजित केली आहे.