शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशवासीयांचे आराध्य दैवत कानबाई मातेची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:26 IST

खान्देशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेच्या दोनदिवसीय उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात वाजत-गाजत मिरवणुकीने करण्यात आली.

सिडको : खान्देशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेच्या दोनदिवसीय उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात वाजत-गाजत मिरवणुकीने करण्यात आली.  श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई मातेचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सिडको परिसरात कानबाई मातेची स्थापना करण्यात येऊन गल्ली, चौका-चौकात कानबाई मातेची अहिराणी गाणी ऐकायला मिळत होती. सालाबादप्रमाणे यंदाही श्री कानबाई माता सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने उत्तमनगर येथून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. वसंत चौधरी यांच्याकडे स्थापन केलेल्या कानबाई मातेची विधिवत पूजा करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. वाजत-गाजत निघालेल्या मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक अहिराणी गाणी सादर केली. त्यात मिरवणुकीतील सहभागी आबालवृद्ध व पदाधिकाºयांनीही ठेका धरला. साईबाबानगर, महाकाली चौक, जगताप मळा येथील महालक्ष्मी मंदिर प्रांगणात कानबाई मातेचे विसर्जन करण्यात आले.  यावेळी नगरसेवक नीलेश ठाकरे, छाया देवांग, मुकेश शहाणे, जगन पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल मटाले, अरुण वेताळ, भूषण राणे, शंकर पाटील, यशवंत नेरकर, जगन आहिरे, राजू परदेशी, दिलीप देवांग तसेच सार्वजनिक उत्सव समितीचे रवि पाटील, नितीन माळी, रवींद्र पाटील, भगवान पाटील, सुरेश सोनवणे, सुनील भारोटे, चंदन चौधरी आदी सहभागी झाले होते.सिडको परिसरातून शोभायात्राखांदेशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो. प्राचिन काळापासून सुरू असलेल्या या उत्सवाची परंपरा नवीन नाशिक परिसरातील श्री कानबाई माता सार्वजनिक उत्सव समिती नाशिक यांनी सुरू केली होती. पारंपरिक कानबाई गीतांच्या ठेक्यावर शोभायात्रा उत्तमनगर-साइबाबानगर-महाकाली चौक परिसरातून जगताप मळा येथील महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात विसर्जन करण्यात आले. दरम्यान, शोभायात्रेत कानबाईच्या गीतांवर नगरसेवक छाया देवांग, मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, सार्वजनिक उत्सव समितीचे सद्य व नागरिक यांनी ठेका धरला. यावेळी पारंपरिक वाद्य, फुगड्या खेळणाºया महिला, लेझिम पथक आदींच्या सहभागाने मिरवणुकीत रंगत वाढली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक