शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

येवला मतदारसंघातील माजी आमदार कल्याणराव पाटील यांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 16:55 IST

भाजपातून शिवसेनेत : मातोश्रीवर बांधले शिवबंधन

ठळक मुद्देशुक्रवारी (दि.२) मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी शिवबंधन बांधले

लासलगाव : विविध पक्षांतून भाजपात मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत असताना येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी मात्र भाजपाला सोडचिठ्ठी देत स्वगृही म्हणजे शिवसेनेत घरवापसी केली आहे. शुक्रवारी (दि.२) मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी शिवबंधन बांधले. दरम्यान, पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने इच्छुकांच्या भु्रकुट्या उंचावल्या आहेत.दीड वर्षापूर्वी कोल्हापूर येथे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु भाजपात ते कधी सक्रीय झाल्याचे दिसून आले नाही. निफाड-येवला मतदार संघात दोन टर्म आमदारकी भूषविणाऱ्या कल्याणराव पाटील यांनी शिवसेनेकडून प्रतिनिधीत्व केले होते. आमदार म्हणुन माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली होती. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी विकासाच्या मुद्यावर राष्टÑवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांना पाठिंबा दर्शविला होता. केंद्र व राज्यातील बदलती समिकरणे पाहून त्यांनी दीड वर्षापूर्वीच भाजपात प्रवेश केला परंतु, भाजपात ते कुठे सक्रीय झाल्याचे दिसून आले नाही. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ठिकठिकाणच्या नेत्यांची मेगाभरती सुरू असताना कल्याणराव पाटील यांनी मात्र, भाजपला रामराम ठोकत पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शुक्रवारी मातोश्रीवर पाटील यांनी पुन्हा भगवा हाती घेतला. याप्रसंगी खासदार संजय राऊत, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, बाळासाहेब टापसे आदी उपस्थित होते. दरम्यान, भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू असताना पाटील यांनी भाजपातून शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतल्याने भाजपातील स्थानिक नेते-कार्यकर्तेही चक्रावले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक