कळवण : येथील युवक सुशांत जयेश पगार (२१) याचे मखमलाबाद नाशिक परिसरामध्ये अपघाती निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवराम पगार यांचा नातू सुशांतने बीईपर्यंत शिक्षण पूर्ण करून एमबीएच्या पुढील शिक्षणासाठी नाशिक येथे तो फॉर्म भरण्यासाठी गेला होता. नाशिकहून कळवणला घरी येताना मखमालाबाद परिसरात झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते देवराम पगार यांच्या मोठ्या जावई व मुलीचे कोरोना काळात निधन झाल्याने पगार परिवार दुःखात असताना जयेश पगार कुटुंबातील एकुलता एक सुशांतचे अपघाती निधन झाल्यामुळे पगार परिवारावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांचा तो भाचा होता. सुशांतच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी, आजोबा, असा परिवार आहे.
कळवणच्या युवकाचे नाशकात अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 23:05 IST
कळवण : येथील युवक सुशांत जयेश पगार (२१) याचे मखमलाबाद नाशिक परिसरामध्ये अपघाती निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
कळवणच्या युवकाचे नाशकात अपघाती निधन
ठळक मुद्देमखमालाबाद परिसरात झालेल्या अपघातात त्यांचे निधन