शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कळवण इनरव्हील क्लबने निभावले सामाजिक दायित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

इनरव्हील क्लब कळवणतर्फे कळवण खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ८० विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसची भेट देण्यात आली. ...

इनरव्हील क्लब कळवणतर्फे कळवण खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ८० विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसची भेट देण्यात आली. अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष स्नेहा मालपुरे होत्या. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सुनीता पगार, अनिता जैन, भाग्यश्री पगार, इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी नयना पगार, सरपंच रत्नाबाई पवार, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, विस्तार अधिकारी डी. ए. पवार, निशादेवी गिरी, समाधान शिंदे आदी उपस्थित होते. आदिवासी आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध प्रकारची मदत करणाऱ्या इनरव्हील क्लबचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांनी सांगितले. इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष स्नेहा मालपुरे म्हणाल्या की , आगामी काळातही क्लब अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणार असून, सर्व सदस्या त्यासाठी प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमास इनरव्हील क्लबच्या खजिनदार मीनाक्षी मालपुरे, स्मिता खैरनार, मनीषा जुन्नरे, मनीषा मालपुरे, निशा वालखडे, मंजूषा देवघरे, मनीषा शिंदे, शैला खैरणार, मनीषा वाघ, वैशाली कोठावदे, लता वेढणे, निशा कोठावदे, माधुरी अलई, शोभा पगार, मुख्याध्यापक धनंजय मालपुरे, सरूबाई गुंजाळ, प्रशांत वाघ, सुनीता सोनवणे आदींसह रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते.

इन्फो

शाळेसाठी यांचाही हातभार

जिल्हा परिषद कळवण खुर्द शाळेला शासनाच्या डोनेट अ डिवाइस कार्यक्रमांतर्गत इनरव्हील क्लब कळवणतर्फे ८० विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस, नगरसेविका सुनीता पगार, अनिता जैन, भाग्यश्री पगार यांच्या वतीने स्कॅनर व प्रिंटर, मिथुन शिंदे यांच्यातर्फे स्मार्ट एलईडी टीव्ही, सुभाष शिरोडे व आबा सूर्यवंशी यांच्यातर्फे प्रत्येकी सहा खुर्च्या, प्रवीण संचेती यांच्याकडून स्पीकर एम्प्लिफायर, योगेश शिंदे यांच्याकडून ८० विद्यार्थ्यांना स्वेटर भेट देण्यात आले.