शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुका कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:55 IST

कळवण : तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाची तालुका आरोग्य व उपजिल्हा रुग्णालय, तहसील, नगरपंचायत, पंचायत समिती, पोलीस या सर्वच प्रशासकीय यंत्रणांकडून झालेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे कळवण शहर व तालुका कोरोनापासून मुक्त झाला असून केवळ एका अहवालामुळे तालुका चर्चेत येऊन माथी कोरोनाचा टिळा लागला होता.

कळवण : तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाची तालुका आरोग्य व उपजिल्हा रुग्णालय, तहसील, नगरपंचायत, पंचायत समिती, पोलीस या सर्वच प्रशासकीय यंत्रणांकडून झालेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे कळवण शहर व तालुका कोरोनापासून मुक्त झाला असून केवळ एका अहवालामुळे तालुका चर्चेत येऊन माथी कोरोनाचा टिळा लागला होता. तालुक्यात आढळून आलेल्या ११ वर्षीय बालकात कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ९ मे रोजीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ११ वर्षीय बालक पूर्णत: ठणठणीत बरे झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी सांगितले.नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार पहिला पेशंट लक्षणे मुक्त असल्याने आणि नवीन रुग्ण तसेच संशयितसुद्धा नसल्यामुळे तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कळवण शहरासह तालुका कोरोनामुक्त झाला असल्याच्या वृत्ताला डॉ. पाटील यांनी दुजोरा दिला आहे.१२ मे रोजी कळवण शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, हा कळवण तालुक्यातील पहिलाच रुग्ण असल्याने प्रशासकीय यंत्रणेसोबत नागरिकही धास्तावले होते. त्यामुळे कळवण शहरातील अंतर्गत सर्वत्र रस्ते बंद करून शिवाजीनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. कळवण शहरात करोना रुग्ण आढळल्यानंतर आमदार नितीन पवार यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, तहसीलदार बंडू कापसे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, डॉ. राजेश काटे यांनी प्रशासकीय नियोजन करून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी, दक्षता घेण्याच्या सूचना, आरोग्य विभागाकडून परिसराचे सर्वेक्षण, रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी, नगरपंचायत प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्रात जंतुनाशक फवारणी, परिसर कंटेन्मेंट झोन करून यंत्रणा सतर्क ठेवली होती.----------------------नऊ अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांना दिलासादि. १२ मे रोजी कळवणच्या एका मुलाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. या रुग्णाला कुठलीही प्रवास पार्श्वभूमी नसून त्याचे वडील शासकीय सेवेत कार्यरत आहेत. सध्या ते मालेगाव येथे कार्यरत असल्याने खबरदारी म्हणून संपूर्ण कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क झाली होती. शहर व तालुक्यात धाकधूक वाढली असताना रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या सर्व नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कळवणकरांना मोठा दिलासा मिळाला होता.

टॅग्स :Nashikनाशिक