शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कळसुबाई मित्र मंडळाकडून रॅपलिंगद्वारे लिंगाणा किल्ला सर, सामूहिक स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 13:19 IST

घोटी- राज्यातील गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी गेली अनेक वर्षांपासून निस्पृहपणे काम करणाºया घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाच्या सदस्यानी सरत्या वर्षाला अनोख्या पद्धतीने निरोप दिला.या ग्रुपमधील सदस्यांनी राज्यात चढाईसाठी अंत्यत खडतर आणि अवघड समजला जाणारा रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ला रॅपलिंगच्याद्वारे सर करीत एक आदर्श निर्माण केला आहे.

घोटी- राज्यातील गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी गेली अनेक वर्षांपासून निस्पृहपणे काम करणाºया घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाच्या सदस्यानी सरत्या वर्षाला अनोख्या पद्धतीने निरोप दिला.या ग्रुपमधील सदस्यांनी राज्यात चढाईसाठी अंत्यत खडतर आणि अवघड समजला जाणारा रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ला रॅपलिंगच्याद्वारे सर करीत एक आदर्श निर्माण केला आहे.घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाची भगीरथ मराडे यांनी स्थापना केल्यानंतर हे मंडळ गेली अनेक वर्षांपासून गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी जनजागृती करीत आहे.या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत तसेच पर्यावरणाच्या रक्षणार्थ गड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली आहे.या मंडळाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यात चढाईसाठी सर्वात अवघड आणि खडतर समजला जाणारा रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ला रॅपलिंगच्या दोरीच्या सहाय्याने चढण्याचा निर्धार केला.यानुसार या मंडळाचे भगीरथ मराडे, बाळू राधाकिसन आरोटे, अशोक हेमके, प्रशांत येवलेकर, प्रशांत जाधव, बालाजी तुंबारे, संतोष म्हसणे, लकी राका, प्रवीण भटाटे, गजानन चव्हाण आदींनी हा किल्ला तब्बल बारा तासाहून अधिक काळ रॅपलिंग करीत पादाक्र ांत केला.दरम्यान या युवकांनी यावरच न थांबता किल्ला परिसराची स्वच्छता केली.या उपक्र माचे राज्यातील पर्यटक, इतिहासकार यांच्याकडून कौतुक होत आहे.--------------राज्यातील सर्वात अवघड आणि खडतर समजला जाणारा लिंगाणा किल्ला सर करणे हे आमच्यासाठी एक आव्हान होते. मात्र मंडळाच्या सर्व सदस्याचा नियमित सराव असल्याने हे आव्हान आम्ही समर्थपणे पेलले. अनोळखी वाट, रात्रीचा अंधार यात रॅपलिंग करणे हा एक थरार होता.-भगीरथ मराडे, संस्थापक अध्यक्ष, कळसुबाई मित्र मंडळ

टॅग्स :Nashikनाशिक