घोटी - इगतपुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या कल्पना हिंदोळे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान आडोळे यांची बिनविरोध निवड झाली. आज झालेल्या विशेष बैठकीत अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार अनिल पुरे यांनी निवड झाल्याची घोषणा केली. पंचायत समतिीच्या १० पैकी ७ जागा जिंकून शिवसेनेने पंचायत समितीची सत्ता निर्विवादपणे एकतर्फी संपादन केली होती.इगतपुरी पंचायत समितीच्या सभागृहात अध्यासी अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभापतीपद अनुसूचित जमातीच्या मिहलेसाठी आरिक्षत करण्यात आलेले आहे. सभापतीपदासाठी खंबाळे गणाच्या शिवसेनेच्या नविनर्वाचित पंचायत समतिी सदस्या कल्पना हिंदोळे यांच्या नावाची सूचना विमल तोकडे यांनी केली. उपसभापतीपदासाठी नांदगाव सदो गणाचे शिवसेनेचे नविनर्वाचित पंचायत समतिी सदस्य तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान आडोळे यांच्या नावाची सूचना गटनेते विठ्ठल लंगडे यांनी आणली. दोन्ही पदांसाठी प्रत्येक एक एक अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांनी सभापती म्हणून कल्पना हिंदोळे, उपसभापती म्हणून भगवान आडोळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. निवडीची घोषणा होताच तालुकाभरातील शिवसैनिकांनी अभूतपूर्व जल्लोष केला.
इगतपुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी कल्पना हिंदोळे
By admin | Updated: March 14, 2017 17:11 IST