शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कालिका यात्रा’ नजरकैदेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:05 IST

नाशिकची ग्रामदेवता असलेल्या श्री कालिकोत्सव यात्रेची गेल्या अनेक वर्षांची परंपरा पोलिसांनी सुरक्षेचा बाऊ करून खंडित केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत वर्षातून एकदाच भरणाºया या यात्रेचे आबालवृद्धांना असलेले आकर्षणही आता कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव भविष्यात लोप पावण्याचे संकेत यानिमित्ताने मिळू लागले असून, नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत नाशिकसह परजिल्ह्यातील विक्रेते, कलाकारांना रोजगार उपलब्ध करून देणारी यात्रा निव्वळ नाममात्र ठरल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकमत  विशेषनाशिक : नाशिकची ग्रामदेवता असलेल्या श्री कालिकोत्सव यात्रेची गेल्या अनेक वर्षांची परंपरा पोलिसांनी सुरक्षेचा बाऊ करून खंडित केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत वर्षातून एकदाच भरणाºया या यात्रेचे आबालवृद्धांना असलेले आकर्षणही आता कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव भविष्यात लोप पावण्याचे संकेत यानिमित्ताने मिळू लागले असून, नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत नाशिकसह परजिल्ह्यातील विक्रेते, कलाकारांना रोजगार उपलब्ध करून देणारी यात्रा निव्वळ नाममात्र ठरल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवापाठोपाठ नाशिककरांना कालिका यात्रेचे मोठे आकर्षण राहिले आहे. नवरात्रीच्या अगोदरपासूनच खुद्द कालिका मंदिर विश्वस्तांकडून मंदिराच्या आवारात तयारीला प्रारंभ केला जातो, तर मंदिराच्या बाहेरील जुना आग्रारोडवरील गडकरी चौक ते हॉटेल संदीपपर्यंतच्या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने दुतर्फा उभ्या राहणाºया तात्पुरत्या गाळ्यांचा लिलाव केला जातो. गावोगावच्या यात्रेमध्ये विविध वस्तुंची विक्री करणारे खेळणीवाले, छायाचित्रकार, नकलाकार, मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणारे, खाद्यपदार्थ, कपडे, गृहोपयोगी वस्तंू आदींची दुकाने याठिकाणी आजवर थाटली गेली आहेत. गेल्या वर्षापर्यंत महापालिका, पोलीस यंत्रणा व स्थानिक स्वयंसेवकांच्या सहमतीने कालिकायात्रा निर्विघ्न पार पडत आली, आजवर कोणताही अनुचित प्रकार या यात्रेच्या काळात घडला नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. असे असताना यंदा मात्र पोलिसांनी थेट नाशिककरांच्या सुरक्षेशी कालिका यात्रेचा संबंध जोडून भाविकांबरोबरच श्री कालिका देवीलाही वेठीस धरले आहे.  नाशिक महापालिकेने जुना आग्रारोडवर कालिका यात्रेसाठी गाळ्यांची अनुमतीसाठी पोलिसांकडे अनुमती मागितली असता ती विविध कारणांनी नाकारण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने सुरक्षिततेचे कारण देतानाच, या उपरही जर गाळे उभारण्यात येणार असतील तर अनुचित प्रकार घडल्यास महापालिकेने त्याची जबाबदारी घ्यावी अशी अट टाकण्यात आल्याने महापालिकेने यातून अंग काढून घेतले. परिणामी दरवर्षी रस्त्याच्या दुतर्फा एकाच रांगेत, एकमेकांना खेटून उभे राहणारे यात्रेतील दुकाने यंदा उभारण्यासाठी कोणी पुढे आलेच नाही. ज्यांनी हा प्रयत्न करून पाहिला त्यांना पोलिसांनी पिटाळून लावले आहे. त्यामुळे यात्रेत दुकान लावण्याच्या भरवशावर लाखो रुपयांचा माल खरेदी करणाºया व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे, त्याचबरोबर लहान विक्रेत्यांचाही हिरमोड झाला आहे. पोलिसांकडून रस्त्यावर बसण्यास विक्रेत्यांना नकार दिला जात असल्याने नाशिककरांचे आकर्षण असणारी कालिका यात्रा यंदा फिकी फिकी वाटू लागली आहे.  नवरात्रोत्सव सुरू होऊन तीन दिवस उलटले असून, अजूनही कालिका देवीची यात्रा भरल्यासारखी वाटत नसल्याची प्रतिक्रिया भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. कालिका यात्रेत होणाºया भाविकांच्या गर्दीचा फायदा समाज कंटकांकडून घेतला जाण्याची शक्यता पोलीस यंत्रणेने व्यक्त केली आहे. खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानात वापरण्यात येणाºया गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याची तर लहान मुलांच्या खेळण्यांच्या माध्यमातून दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटासारखे दहशतवादी कृत्य घडवून आणले जाऊ शकते, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या साºया गोष्टींची जबाबदारी जो कोणी घेईल त्याला कालिका यात्रेत दुकाने उभारण्याची अनुमती देण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यामुळे यंदा कोणीच विक्रेता व व्यावसायिकाने दुकान लावण्याचे धाडस केलेले नाही. गणेशोत्सवात डीजेवर बंदी लादल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती नवरात्रोत्सवातही करण्यात आल्यामुळे देवीभक्तांमध्ये अगोदरच नाराजी असताना आता अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या कालिका यात्रोत्सवावरही नानाविध बंधने लादून पोलीस उत्सवाची रयाच घालवू लागल्याची भावना नाशिककर व्यक्त करू लागले आहे, या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या दौºयावर आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार देवयानी फरांदे तसेच कालिका मंदिराच्या विश्वस्तांनी तक्रार केली आहे.सुरक्षेचे कारण की आणखी काही?कालिका यात्रेत यंदा विक्रेत्यांचे दुकाने लावण्यास पोलीस प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामागे भाविकांच्या सुरक्षेचे कारण दिले जात असले तरी, प्रत्यक्षात कालिका यात्रेच्या अवतीभवती मोठ मोठे मॉल, भव्य शोरुम्स, व्यापारी प्रतिष्ठाने उभी राहिली आहेत. या दुकानांच्या बाहेरच यात्रेतील दुकाने दहा दिवसांच्या कालावधीत थाटली जातात. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळेच यंदा दुकानांच्या बाहेर यात्रेचे स्टॉल लावू देऊ नये यासाठी मोठ्या व्यावसायिकांनी पोलिसांना हाताशी धरून यात्रेच्या दुकानांवर बंदी लादल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे पोलिसांचे म्हणणे योग्य की, व्यावसायिकांचा आरोप यावर जोरदार चर्चा होत आहे.मंदिर आवारात दुकाने थाटलीसालाबादाप्रमाणे यंदाही कालिका मंदिराच्या आवारात विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. सदरची जागा मंदिराच्या मालकीची आहे. सुमारे पन्नास वर्षांपासून या ठिकाणी दरवर्षी नवरात्रोत्सवात व्यावसायिक दुकाने लावतात. त्या दुकानांच्या जागेचा लिलावाचा अधिकार विश्वस्त मंडळाला आहे. आजच्या घडीला सुमारे ३५ दुकाने थाटण्यात आली असून, काही स्थानिक व पर जिल्ह्यातील विक्रेत्यांसाठी विश्वस्त मंडळाने वीज, पाणी तसेच राहण्याचीही व्यवस्था केली आहे. सुरक्षेचा विचार करता मंदिराच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, याशिवाय विश्वस्तांनी यंदा भाविकांच्या सुरक्षेचे सुमारे दोन कोटी रुपयांचा विमा काढला आहे. मंदिराच्या आवारात खासगी सुरक्षा रक्षक तसेच स्वयंसेवकांच्याही नेमणुका करण्यात आल्या आहेत.पालकमंत्र्यांकडे विक्रेत्यांची तक्रारकालिका मंदिर विश्वस्तांनी आयोजित केलेल्या नूतन सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे येथील व्यावसायिकांनी पोलिसांच्या विरोधात तक्रार केली आहे. दरवर्षी कायदा व नियमांच्या अधीन राहून लहान-मोठे व्यावसायिक कालिकेच्या यात्रेत सहभागी होत असताना यंदा पहिल्यांदाच अशा प्रकारचे बंधने लादून नागरिकांच्या आनंदावर तसेच व्यावसायिकांच्या धंद्यावर गदा आणल्याबद्दल लक्ष घालावे, अशी विनंती व्यावसायिकांनी केली. त्यावर पालकमंत्री महाजन यांनी पोलिसांना याबाबत विचारणा करून तात्पुरती अनुमती देण्याच्या सूचना दिल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले.