शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास कलामंदिर खासगीकरणानंतर वाढेल व्यावसायिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:02 IST

शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याचा पालिकेचा विचार असून, या गोष्टीला सर्व स्तरातून विरोध होत आहे.

नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याचा पालिकेचा विचार असून, या गोष्टीला सर्व स्तरातून विरोध होत आहे. कालिदासचे खासगीकरण झाल्यास आजवर वर्षानुवर्षे या संस्थेत मिळणारा जिव्हाळा क्षणात दूर होऊन तेथे व्यावसायिक वृत्ती वाढीस लागेल. याचा फटका आयोजकांना तर बसेलच; पण नाशिककर रसिकांनाही त्याची झळ बसेल. त्यामुळे कालिदासचे खासगीकरण होऊ नये, अशा भावना वितरक, शैक्षणिक संस्था, नृत्य संस्था आदींच्या प्रतिनिधींनी बोलून दाखविल्या. याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद.महाकवी कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करू नये कारण त्यामुळे आयोजक आणि नागरिक दोघांनाही आर्थिक फटका सहन करावा लागेल. जर महापालिकेला ताकदीने कालिदासचे व्यवस्थापन पेलवणार असेल तर खासगीकरण करण्याची गरजच पडणार नाही. कालिदासचे आधुनिकीकरण झाले आहे. ते तसेच टिकून राहील याची काळजी घ्यावी.- विद्या देशपांडे,  प्रसिद्ध नृत्यांगनाकालिदास कलामंदिरचे खासगीकरण होऊ नये. खासगीकरण झाल्यास आॅर्केस्ट्रा, नृत्य कार्यक्रम, शाळांची स्नेहसंमेलने, पुस्तक प्रकाशन अशा संस्थांना खासगीकरणानंतरचे वाढीव दर परवडणार नाही. अशा लहान संस्था आधीच मोठी जुळवाजुळव करून कार्यक्रम पार पाडतात. यासाठी छोट्या संस्थांना मोठी आर्थिक कसरत करावी लागते. त्यात आता खासगीकरण झाल्यास सगळेच गणित कोलमडेल. शिवाय आपुलकी, जिव्हाळा या गोष्टीही दुरापास्त होतील.- उमेश गायकवाड, आॅर्केस्ट्रा असोसिएशन

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका