लखमापूर : ग्रामीण भागातील अनेक व्यवसाय काळाच्या ओघात हद्दपार झाले आहेत. त्यात कल्हई व्यवसायाचाही समावेश आहे. हा व्यवसाय सध्या काळानुरूप हद्दपार होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.काळ बदलला. माणसं बदलली. माणसांच्या गरजा बदलल्या. सोईची संकल्पना बदलली. पर्याय उपलब्ध झाले. अगदी दैनंदिन आयुष्यातल्या वस्तू, भांडीसुद्धा बदलली. तांबे, पितळीची भांडी गेली. त्याची जागा स्टीलने घेतली. त्यामुळे तांबे, पितळीच्या भांड्यांना कल्हई करण्याच्या व्यवसायाला पर्यायाने उतरती कळा लागली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना शासनाने विशेष स्वरूपाची मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.---------------------पूर्वी आम्ही कल्हईचा व्यवसाय करून महिन्याकाठी ३००० ते ४००० हजार रु पये कमाई करीत होतो; परंतु आता मात्र तांबे, पितळीची भांडी इतिहास जमा झाल्याने सध्या कोणीही भांड्यांना कल्हई करीत नसल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यावसायिकांना शासनाने विशेष स्वरूपाची मदत करावी.- चाचा मालेगाववाले, कल्हई व्यावसायिक